तंदुरुस्तीसाठी व्यायाम आहे जरुरीचा

01 Jun 2023 13:36:27
 


health
 
 
 
व्यायामाच्या दृष्टीने अशी याेजना बनवावी जी आपल्या आवश्यकतांच्या अनुरूप असावी. शरीर फिट राहण्यासाठी असा प्राेग्रॅम बनवावा जाे आपला फिटनेस स्तर, क्षमता आणि आवश्यकता यांच्या नुसार असावी. यासाठी सर्वांत प्रथम आपल्या प्राथमिकता निश्चित कराव्यात. आपल्या स्वास्थ्याचे लक्ष्य निर्धारित करावे. आठवड्यातील सात दिवसांची याेजना बनवावी. ज्यामुळे आपल्या स्वास्थ्यात निश्चितच सुधारणा हाेईल.पुरेसे भाेजन घ्यावे. पाेषक तत्त्वांची संयमित मात्रा घ्यावी आणि दरराेज व्यायाम करावा. खान-पानाचा साप्ताहिक चार्ट बनवावा. भाेजनानंतर हे निश्चित करावे की, आपणास कॅलरीची अवश्यक मात्रा खर्चही करावयाची आहे.
आपण जर आपली एराेबिक क्षमता व एथलेटिक प्रदर्शन यांमध्ये सुधारणा करवू इच्छित असाल तर काही अधिक व्यायाम हाेईल. परंतु प्रत्येक स्थितीमध्ये हे फायदेशीर हाेत नाही. हलका व्यायाम करण्याने जसे पायी चालण्याने आपले वजन कमी हाेऊ शकते, तणाव आणि र्नतदाब यांमध्ये आराम मिळताे.
Powered By Sangraha 9.0