वृद्धावस्था लवकर येऊ नये यासाठी...

    31-May-2023
Total Views |
 
 

Exercise 
 
वृद्धत्वाला सर्वांनाच सामाेरे जावे लागते; परंतु वृद्धावस्था लवकर येऊ नये यासाठी काही गाेष्टींचा अवश्य अवलंब करता येईल. यासाठी अजमावून पाहा खालील टिप्स-
 
-मानसिक कमजाेरीपासून बचावासाठी शारीरिक व्यायामाबराेबरच व्हिटॅमिन ‘बी’ युक्त आहार घ्यावा.
-वयाच्या 35 वर्षांच्या आसपास हाडे कमकुवत हाेऊ लागतात अशात पायी चालणे, धावणे, आणि वजन उचलणे यांसारखे व्यायाम करण्याने हाडे तंदुरूस्त हाेतात. याचबराेबर लक्षात ठेवावे की, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’ची भरपूर मात्रा घेत राहावे. असे सांगितले जाते की 19 ते 50 वर्षे दरम्यानचे वय असलेल्या लाेकांनी दरराेज 1000 मि.ग्रँ.कॅल्शियम आणि 51 वर्षेवरील वयाच्या लाेकांनी दरराेज 1200 मि.ग्रॅ. कॅल्शियम (4 ग्लास दूध) घेणे आवश्यक आहे.
- ायबरयुक्त भाेजन ायदेशीर आहे. महिलांनी दरराेज 25 ग्रॅम आणि पुरुषांनी दरराेज 35 ग्रॅम ायबरयुक्त भाेजन घ्यावे, असा सल्ला दिला जाताे.
- दरराेज कमीतकमी 30 मिनिटे वेगाने चालणे चांगले आहे. काेलेस्टेराॅल कमी करण्यासाठी अंकुरित दाळी खाव्यात.
- मांसाहारी असाल तर आठवड्यातून कमीतकमी दाेन वेळा मासे खावेत.
- धूम्रपान बिलकूल करू नये. याने त्वचेवर अकाली सुरकुत्या पडतात.
- सूर्याच्या थेट किरणांपासून बचाव करावा.
- नेहमी सकारात्मक विचार करावेत.
- भाेजनात साेडियमची मात्रा नियंत्रित असावी. डाॅक्टरांच्या मते, 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे लाेक दरराेज अधिकाधिक 2400 मि.गॅ्र. साेडियम ग्रहण करू शकतात आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लाेक 1500 मि.ग्रॅ. पर्यंत साेडियम ग्रहण करू शकतात.