आपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखावा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    31-May-2023
Total Views |
 
 

CM 
 
‘एक वेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते; पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी हाेऊ नये यासाठी दक्ष राहावे.शाेधमाेहीम-बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फाेन सुरू ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या माॅन्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला.
 
सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनाेज साैनिक यांच्यासह लष्कर, नाैदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, हवामान खाते, गृह तसेच विविध विभागांचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित हाेते.जिल्हाधिकारी, विभागीय आयु्नत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाेलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी दृक्श्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते.मुख्यमंत्र्यांनी आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला.
 
मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आपत्ती जाेखीम तसेच त्या अनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्त्वपूर्ण असे निर्देशही दिले. बैठकीत मुंबईतील 226 धाेकादायक इमारतींपैकी 27 इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरित ेल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की सर्वच महापालिकांनी धाेकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळता येईल.नालेसफाईवर लक्ष द्यावे. मुंबईत रेल्वे आणि महापालिकेने नालेसफाईबाबत संयु्नत माेहीम राबवावी. दरडी काेसळणाऱ्या संभाव्य ठिकाणी उपाययाेजनांबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव द्यावा.एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच लष्कर, नाैदल, हवाई दलाच्या मागणीनुसार उपकरणे तत्काळ उपलब्ध हाेतील, यासाठी प्राधान्याने कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.