व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात वाचन हे असे औषध आहे जे तुमचा कंटाळा, ताण झटक्यात दूर करतं. पुस्तक वाचताना तुम्ही तुमचं आयुष्य विसरून एका वेगळ्या जगात असता. हे जग तुम्हाला ताण विसरायला भाग पाडते. वाचन आणि आपलं मानसिक स्वास्थ्य, मनावरचा ताण उतरणं, चिडचिड-एन्झायटी कमी हाेणं याचा संबंध असताे हे आपल्या लक्षातच येत नाही. महिलांपेक्षा पुरुष जास्त वाचतात. मात्र पुरुषांपेक्षा वाचनाची गरज महिलांना जास्त आहे आणि त्यांनी त्यासाठी वेळ काढायलाच हवा. आता मुद्दा तसा वेळ काढता येताे का? तर इच्छा असेल तर काढता येताे,माणसाची शीमंती त्याच्या शब्दसंपत्तीवर पाहिली जाते.
फक्त याचसाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आपले म्हणणे किती याेग्य शब्दात मांडू शकता, यावर तुमचे यश अवलंबून आहे. वाचनामुळे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तसेच तुमच्या लेखन काैशल्यात भर पडते. त्यामुळे जितका जास्त शब्दसंग्रह, तितके यश तुमच्या जवळ असते.पुस्तके वाचनाने आपण जगाबद्दल ज्ञान प्राप्त करू शकताे. वाचनाने नवनवीन गाेष्टी शिकायला मिळतात.
वाचनाचा महिमा महान लाेकांनी सांगितला आहे.एकदा लाेकमान्य टिळकांनी सांगितले की जर त्यांना वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर ते नरकामध्ये पण आपले जीवन जगून घेतील. पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसम्मान वाढताे. पुस्तकांमुळे आपला शब्दसंग्रह सुधारताे.