त्वचेच्या रंगाला अनुरूप कृत्रिम हात तयार करण्यात यश

    24-May-2023
Total Views |
 
 
 


skin
 
दुर्घटना अथवा अपघातांत हात गमावलेल्यांसाठी मानवी त्वचेच्या रंगाचे हात संशाेधकांनी तयार केले आहेत.त्यांची किंमत सुमारे पाच ते साडेपाच लाख रुपये असेल.एखाद्या दुर्घटनेत एक अथवा दाेन्ही हात गमाविण्याची दुर्दैवी वेळ काहींवर येते. त्यांच्यासाठी कृत्रिम हातांची साेय असली, तरी त्यांच्या रंगामुळे ते लक्षात येतात. पण, आता असे हाेणार नाही.आयआयटी कानपूरच्या ‘लाइफ अँड लिम्ब’ या स्टार्टअपने असा त्वचेच्या रंगाचा कृत्रिम हात तयार केला आहे.केवळ 300 ग्रॅम वजन असलेले हे हात सुमारे 6.5 लाख शेड्समध्ये उपलब्ध असल्याने त्वचेचा रंग कसाही असला,तरी संबंधिताला त्या रंगाचा हात मिळू शकेल. नैसर्गिक वाटावा असा हा हात दिसेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.निशांत अग्रवाल आणि प्राची खरब हे ‘लाइफ अँड लिम्ब’ या स्टार्टअपचे संस्थापक आहेत. नैसर्गिक हातांप्रमाणे हा कृत्रिम हात काम करताे आणि त्याचे अंगठे तसेच सर्व बाेटेही काम करत असल्याची माहिती निशांत अग्रवाल यांनी दिली.
 
्निलनिकल चाचण्या पूर्ण : या कृत्रिम हाताच्या सर्व ्निलनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून, वैद्यकीय उपकरणांसाठी आवश्यक असलेले ‘आयएसओ’ तसेच त्याच्या निर्यातीसाठीची प्रमाणपत्रे लवकरच मिळतील, असे निशांत यांनी सांगितले.कृत्रिम हातांना जगभरात माेठी मागणी असून, त्यांचा रंग मानवी त्वचेप्रमाणे असावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात हाेती. निशांत आणि प्राची यांनी त्यासाठी सहा महिने संशाेधन करून त्वचेच्या रंगाचा हात तयार केला. त्यात 6.5 लाख शेड्स उपलब्ध आहेत.‘लाइफ अँड लिम्ब’ने तयार केलेल्या या कृत्रिम हातांचा फायदा हात गमाविलेल्यांना हाेईल. या हातांमुळे असे लाेक सर्वसामान्य माणसांप्रमाणे काम करू शकतील. या हाताच्या पाचही बाेटांचा वापर करता येत असल्याने चमचा अथवा पेन पकडणे श्नय हाेईल. हा हात बॅटरीतील ऊर्जेवर काम करताे आणि ती तळव्यात बसविण्यात आली आहे. बॅटरीसह या हाताचे वजन 300 ग्रॅम आहे.