नाेकरदार वर्गापुढे बचतीचे सर्वांत माेठे आव्हान

    24-May-2023
Total Views |
 
 


Saving
 
जीवन आहे ताेपर्यंत पैशांची गरज असते. आपल्या आणि कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजांबराेबरच मुलांचे शिक्षण आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैसा गरजेचा असताे. त्यासाठी करावे लागते आर्थिक नियाेजन. त्यात बचत आणि गुंतवणुकीचा समावेश हाेताे. आपत्कालीन स्थिती केव्हा आणि कशी उद्भवेल हे सांगणे श्नय नसल्याने तिला सामाेरे जाण्यासाठीही सज्ज असावे लागते. पण, प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती असल्याचे ‘फिनसेफ इंडिया’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून समाेर आले.आर्थिक शिक्षणाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. पैशांची बचत करणे हे लाेकांसाठी माेठे आव्हान असल्याचे या सर्वे क्षणातून दिसले. सर्वेक्षण केलेल्यांतील 57 टक्के लाेक त्यांच्या हाती प्रत्यक्ष येणाऱ्या वेतनाच्या रकमेतील (टेक हाेम सॅलरी) वीस ट्न्नयांपेक्षा कमी रकमेची बचत करतात, तर 24 टक्के लाेक काहीच बचत करत नाहीत.

जीवनशैलीचा खर्च, माेठे गृहकर्ज आणि बचतीची मानसिकता नसणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. 1,364 नाेकरदारांचे सर्वेक्षण करून ही माहिती घेण्यात आली आहे.आपत्कालीन स्थितीला सामाेरे कसे जाणार? भारतात आर्थिक नियाेजनाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या फायद्यांवर नाेकरदार अवलंबून असून, आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण याेग्य मार्गाने जाताे आहाेत का, याबाबत त्यांना खात्री नाही. उदा. आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियाेजन करणे हे सर्वांत माेठे आव्हान असल्याचे 48 टक्के लाेकांनी सांगितले. आपली नाेकरी गेली, तर आपले खर्च चालणार नाहीत, असे 42 ट्न्नयांनी सांगितले.ज्येष्ठ वयाच्या पालकांची जबाबदारी आणि वैद्यकीय खर्च या खर्चाच्या मुख्य बाबी असून, क्रेडिट कार्डावरील कर्ज लवकर फेडता न येणे हीसुद्धा काळजीची एक बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे.

नियाे्नत्याने देऊ केलेल्या मेडिकल कव्हरवर आपण अवलंबून असल्याचे 48 प्रतिसादकर्त्यांनी सांगितले; मात्र, हे कव्हर पुरेसे आहे का, याची त्यांना शंका वाटते. 24 टक्के लाेक वैद्यकीय आणीबाणीला सामाेरे जाण्यासाठी तयार नसल्याचे दिसले. असे असले, तरी लाेक बचतीचा काही प्रमाणात प्रयत्न करतात. 44 टक्के लाेक इक्विटीजमध्ये, तर मुदत ठेवी आणि इन्शुरन्स पाॅलिसिजसारख्या डेट इन्व्हेस्टमेंटमध्ये 36 टक्के लाेक बचत अथवा गुंतवणूक करतात. सर्वेक्षण केलेल्यांतील एक तृतीआंश लाेकांना (34 टक्के) काेठे गुंतवणूक करावी याचे ज्ञान नसल्याने ते काेठेच गुंतवणूक करत नाहीत. आर्थिक नियाेजन, म्यच्युअल फंड्स आणि करांबाबत आणखी माहिती मिळण्याची गुंतवणूकदारांना उत्सुकता आहसंपत्तीच्या निर्माणाचा पाया असलेली बचत करणे हे सर्वांत माेठे आव्हान असल्याचे सर्वेक्षणातून समाेर आले.

57 टक्के लाेक त्यांच्या हाती प्रत्यक्ष येणाऱ्या वेतनाच्या रकमेतील 20 ट्न्नयांपेक्षा कमी रकमेची बचत करतात, तर 24 टक्के लाेक काहीच बचत करत नाहीत. जीवनशैली, माेठे गृहकर्ज आणि बचतीची मानसिकता नसणे ही त्याची कारणे असल्याचे दिसून आले.
अन्य काही पर्याय : म्युच्युअल फंड्सची माहिती बहुतेकांना असून, ‘सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) हे गुंतवणुकीचे चांगले पर्याय असले, तरी एकूण पाेर्टफाेलिओमध्ये त्यांचे प्रमाण कमी आहे.तरुण वयाचे गुंतवणूकदार उच्च परतावा (आणि उच्च जाेखीमही) असलेल्या ‘पी2पी’ (पिअर टू पिअर) लेंडिंग, कंपनी फ्निस्ड डिपाॅझिट्स-नाॅन कनव्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी), स्टाॅक बास्केट्स आदी पर्याय वापरत आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक टुल्स आणि प्लॅटफाॅर्म्स असले, तरी मानवी आर्थिक सल्लागाराने ग्राहकाच्या गरजेनुसार तयार करून दिलेल्या याेजनेला पर्याय नाही. ग्राहकाच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन हे सल्लागार याेग्य त्या याेजना तयार करून देत असल्याने त्या अमलात आणणे सुलभ असते.

नवे आर्थिक वर्ष, नवी उद्दिष्टे : नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ हाेत असताना आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे केव्हाही चांगले ठरते. या निमित्ताने खाली दिलेले प्रश्न विचारात घ्या.तुमच्या हाती प्रत्यक्ष येणाऱ्या रकमेतील किमान 30 टक्के रकमेची तुम्ही बचत करत आहात का? अनिश्चित स्थितीला सामाेरे जाण्याची तुमची तयारी आहे का? आपत्कालीन स्थितीसाठी 3 ते 6 महिने पुरेल एवढी राेख रक्कम तुमच्याकडे आहे का? किमान 10 लाख रुपयांचा आराेग्यविमा तुमच्याकडे आहे का? तुमच्या एकूण पाेर्टफाेलिओचा परतावा चलनवाढीला पुरेसा आहे का? तुमच्या पाेर्टफाेलिओतील जाेखमीचे घटक काेणते? तुमच्या हाती प्रत्यक्ष येणाऱ्या रकमेपेक्षा तुमचे एकूण ईएमआय 30 ट्न्नयांपेक्षा कमी आहेत का? तुमची काही आर्थिक याेजना आहे का?