धावत्या ट्रेनमुळे जी हवा तयार हाेते त्या हवेपासून वीज तयार करण्यासाठी रेल्वेने आता एक प्रयाेग करण्याचा निर्णय घेतला असून, खार-वांद्रे रेल्वे मार्गांवर 5 पवनच्न्नया बसविण्यात आल्या आहेत. हा प्रयाेग यशस्वी झाल्यास रेल्वे मार्गावर जागाेजागी पवनच्न्नया बसविण्याचा पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा विचार आहे. यामुळे रेल्वेचा वीज खर्च खूपच कमी हाेईल.एक पवनच्नकी हवेपासून 1 ते 10 किलाेवाॅट वीज तयार करते. एका रेल्वे अधिकाऱ्याने परदेशात अशाप्रकारे वीज तयार करण्याचा प्रयाेग यशस्वी झाल्याचे पाहिले व हा प्रयाेग महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला. हा प्रयाेग यशस्वी झाला तर फ्नत महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील रेल्वे मार्गांवर जागाेजागी पवनच्न्नया दिसतील. याशिवाय साैरऊर्जेचाही वापर करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे स्टेशन इमारतींच्या छतांवर साेलर पॅनल बसविण्यात आले आहेत.मुंबईतील सुमारे 100 रेल्वे स्टेशनांवर साेलर पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी दीड काेटी रुपयांची वीज बचत झाली हाेती.