2 हजार रुपयांची नाेट चलनातून रद्द करण्याचा साइड इफे्नट

    24-May-2023
Total Views |
 
 


Gold
 
 
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी 2 हजार रु.ची नाेट चलनातून रद्द केल्याची घाेषणा केली व 2हजार रु.च्या नाेटा बँकेतून बदलून घेण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर-2023 पर्यंत मुदत दिली.त्यामुळे देशभर प्रचंड खळबळ माजली व 2 हजार रु.च्या नाेटा बदलून घेण्याची धांदल उडाली आहे.केंद्र सरकारने गेल्या एक वर्षापासूनच 2 हजार रु.च्या नाेटा छापणे बंद केले हाेते. पण, या नाेट रद्द करण्याचा साइड इफे्नट असा झाला आहे की, साेने व चांदीचे भाव एकदम वाढले आहेत.2 हजार रु.ची नाेट चलनातून बाद करण्यापूर्वी साेन्याचा भाव 61 हजार रु. ताेळा हाेता. ताे हा निर्णय हाेताच राताेरात 70 हजार रु. ताेळा झाला. याचे कारण असे की, गरिबांकडे 2 हजार रु.च्या नाेटा नसतील; पण श्रीमंतांकडे भरपूर आहेत.
 
हे लाेक बँकेत 2 हजार रु.च्या नाेटा द्यायला जातील, तर ज्या लाेकांकडे 2 हजार रुपयांच्या नाेटा माेठ्या संख्येने आहेत, त्यांना या नाेटा बँकेत भरताना त्यांची वार्षिक कमाई किती याचा पुरावा मागितला जाईल, याची भीती वाटते. त्यामुळे हे लाेक 2 हजार रु.च्या नाेटा बँकेतून घेण्याऐवजी साेने-चांदी खरेदी करून 2 हजार रु.च्या नाेटा खपवून ही रक्कम गुंतविण्याचा प्रयत्न हे लाेक करत आहेत. त्यामुळे आता सराफी दुकानात 2 हजार रु.च्या नाेटा देऊन साेने-चांदी खरेदी करायची असेल, तर साेने 70 हजार रु. ताेळा आणि चांदी 72 हजार रु. किलाे दराने विकण्यात येत आहे.बँकेत नाेट बदलून घेण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्या दलालांचे रेट वाढले असून, ते 5 ते 8% झाल्याचे समजते.श्रीमंतांकडे असणाऱ्या 2 हजार रुपयांच्या नाेटांचा भरणा हे दलाल बँकेत करतात.