आज आपण सामुद्रिक शास्त्रात कपाळाच्या आकार व ठेवणीवरून काेणत्या गाेष्टी सांगितल्या आहेत ते पाहणार आहाेत.
लहान कपाळ : ज्या व्य्नतींच्या कपाळाचा आकार लहान असताे ते अत्यंत भावुक वृत्तीचे असतात. या व्य्नती लहानसहान गाेष्टींकडे जास्त लक्ष देतात. छाेट्या छाेट्या गाेष्टी यांना सुख वा दु:ख देत असतात, तसेच या व्य्नती स्वत:च्या मनाचे जास्त ऐकतात व एकाकी राहणे जास्त पसंत करतात.
सपाट कपाळ : ज्यांचे कपाळ सपाट असते ते दृढनिश्चयी असतात. एकदा दिलेला शब्द ते कसाेशीने पाळतात, तसेच इतरांवर चटकन विश्वास ठेवत नाहीत.
माेठे कपाळ : ज्यांचे कपाळ खूप माेठे असते ते खूप बुद्धिमान असतात, तसेच हे लाेक भाग्यशाली असतात. यांची निर्णयक्षमता अत्यंत मजबूत असते.तसेच ही माणसे स्वत:चे ध्येय साध्य करण्यासाठी कठाेर परिश्रम करणारे असतात.
गाेलाकार कपाळ : गाेलाकार कपाळ असणारी माणसे हसतमुख आणि सकारात्मक असतात. यांना निराशेत बसून राहणे पसंत नसते. यांच्या मित्रांची संख्याही जास्त असते. हे खूपच विचार करणारे असतात, तसेच यांना स्वप्नाच्या जगात वावरायलाही खूप आवडते.