जगभरात गेल्या वर्षी वाढले मृत्युदंडाच्या शिक्षेचे प्रमाण

    23-May-2023
Total Views |
 
 
 



punishment
 
गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा द्यावी लागते. अत्यंत गंभीर अथवा क्रूर स्वरूपाचा गुन्हा केलेल्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावली जाते.ती असावी की नाही यावर चर्चा हाेत असली, तरी अनेक देशांत ती आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत 2022मध्ये जगभरात मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी सर्वांत जास्त झाल्याचे ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने म्हटले असून, मध्य पूर्वेतील देशांत या शिक्षेची अंमलबजावणी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे नमूद केले आहे.सन 2022मध्ये 20 देशांत एकूण 883 जणांना मृत्युदंड देण्यात आला.2021च्या तुलनेत या प्रमाणात 53 ट्न्नयांनी वाढ झाल्याचे संस्थेने म्हटले आहे. त्यात इराण, साैदी अरेबिया आणि इजिप्त या देशांचा वाटा 90 टक्के हाेता.संस्थेच्या अहवालात चीनचा समावेश नसला, तरी तेथे दरवर्षी हजाराे लाेकांना मृत्युदंड दिला जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चीनमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची माहिती दिली जात नसल्याने नक्की किती जणांना ही शिक्षा झाली असावी याचा केवळ अंदाज करावा लागताे.
 
उत्तर काेरिया, व्हिएतनाम, सिरिया आणि अफगाणिस्तान या देशांतसुद्धा अनेकांना मृत्युदंड देण्यात आल्याचे समजले असले, तरी पुरेशा माहितीअभावी नश्चित संख्या समजू शकलेली नाही.इराण आणि साैदी अरेबियामुळे जगभरात गेल्या वर्षी मृत्युदंडाच्या शिक्षेचे प्रमाण वाढल्याचा दावा ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने केला आहे.इराणमध्ये 2021मध्ये 314 जणांना आणि 2022मध्ये 576 जणांना मृत्युदंड दिला गेला.गेल्या वर्षी दिलेल्या एकूण मृत्युदंडांपैकी 279 जणांना खुनाबद्दल, 255 जणांना अमली पदार्थविषयक गुन्ह्यांबद्दल, 21 जणांना बलात्काराबद्दल आणि 18 जणांना राष्ट्रीय सुरक्षा धाे्नयात आणल्याच्या आराेपावरून ही शिक्षा दिली गेली. साैदी अरेबियात 2021मध्ये 65, तर 2022मध्ये 196 जणांना मृत्युदंड दिला गेला. त्या देशातील गेल्या 30 वर्षांतील हे सर्वाेच्च प्रमाण असल्याचे ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने म्हटले आहे. यातील 88 गुन्हेगारांना दहशतवादी कारवायांच्या, तर 57 जणांना अमली पदार्थांच्या व्यवहाराच्या आराेपावरून ही शिक्षा दिली गेली. अमलीपदार्थविषयक गुन्ह्यांना ही शिक्षा देण्याबाबत 2020पासून तेथे स्थगिती हाेती, पण ती उठविल्याने या शिक्षेची अंमलबजावणी पुन्हा सुरू झाली आहे.