वारंवार येणाऱ्या व दीर्घकाळ टिकणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष नकाे

    23-May-2023
Total Views |
 
 
 


health
 
 
दैनंदिन धावपळीत आपण अनेकदा थकव्याकडे दुर्लक्ष करून कामे संपवत राहताे. सततच्या पळापळीमुळे थकवा येणे नैसर्गिक असले, तरी विश्रांतीनंतर बरे वाटते. पण, विश्रांतीनंतरही ताे जात नसेल, तर काळजी करायला हवी.थकवा येणे हा काही आजार नसला, तरी ताे वारंवार येऊन दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम हाेऊ लागला तर सावध झाले पाहिजे. टाेराेंटाेमधील ‘सेंटर फाॅर ग्लाेबल हेल्थ रिसर्च’च्या म्हणण्यानुसार, जगात दर पाचपैकी एक जण साैम्य स्वरूपाच्या, तर दर दहापैकी एक जण दीर्घकालीन थकव्याने त्रस्त आहे.‘क्राॅनिक फटिग सिंड्राेम’ म्हणजे काय?
 
‘मायल्जिक एन्सेफॅलाेमायलिटिस’ (ाूरश्रसळल शपलशहिरश्रेाूशश्रळींळी) या नावानेसुद्धा ‘क्राॅनिक फटिग सिंड्राेम’ (सीएफएस) हा विकार ओळखला जाताे. ही थकव्याची एक स्थिती असून, तिचा परिणाम मज्जासंस्था (नर्व्हज सिस्टीम), राेगप्रतिकारशक्ती आणि कामाच्या क्षमतेवर हाेताे. हा थकवा कमीत कमी सहा महिने टिकताे. शरीर आणि मनाचा संबंध असलेली कामे करताना या विकाराची लक्षणे गंभीर हाेतात.‘सीएफएस’ हाेण्याची नक्की कारणे माहीत नसली, तरी आनुवंशिकता, जीवाणू आणि विषाणूंचा संसर्ग, शारीरिक- मानसिक धक्का, संप्रेरकांचे असंतुलन आदी घटक त्यामागे असल्याचे समजले आहे.
 
या स्थितीत डाॅ्नटरांकडे जा...
 काेणत्याही ठाम कारणाविना शारीरिक-मानसिक पातळीवर खूप थकवा जाणवणे. विचार करणे आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम हाेऊ लागणे.
 बसताना अथवा झाेपताना चक्कर येत येणे.
 सांधे आणि मांसपेशींमध्ये वेदना हाेणे.
 झाेप पूर्ण झाल्यावरही ताजेतवाने न वाटणे.
 
या विकाराच्या निदानासाठी डाॅ्नटर लघवी आणि रक्ताची तपासणी करतात आणि लक्षणांनुसार उपचार केले जातात.औषधे, न्युट्रिशनल सप्लिमेंट्स, व्यायाम आदी मार्गांनी उपचार केले जातात. थकवा येण्याच्या लक्षणावर केलेल्या उपचारांमुळेसुद्धा ही लक्षणे कमी हाेतात.
 
गंभीर समस्यांचा असू शकताे संकेत :
 रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)  मधुमेह  थायराॅइड  संधिवात मल्टिपल स््नलेराेसिसश्र हृदय अथवा यकृताबाबतचे विकार  दमा  पाेट आणि छातीमध्ये संसर्ग  उच्च रक्तदाब.
 
मुले आणि तरुणांमध्ये वाढता थकवा : अथरुणातून उठता न येणे, सतत थकवा जाणवणे आणि शारीरक क्षमतेनुसार काम न करता येण्यासारखी लक्षणे आता मुले आणि तरुणांमध्ये दिसायला लागली आहेत. या थकव्यामुळे मुलांमध्ये औदासीन्य वाढते. जंकफूडचे वाढते सेवन हे या थकव्याचे एक कारण आहे. जंकफूडचा ग्लायसेमिक इंडे्नस खूप जास्त असताे आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते. पण, ते तेवढ्याच वेगाने कमीसुद्धा हाेते.रक्तातील साखरेत हाेणारा हा वेगवान चढ-उतार थकवा निर्माण करताे. गॅजेट्सचा वाढता वापर हेही थकव्याचे एक कारण आहे.सतत स्क्रीनसमाेर राहण्यामुळे शरीरातील सर्केडियन िऱ्हदममध्ये बदल हाेऊन गाढ झाेप येत नाही.
 
‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या माहितीनुसार, एकटेपणा आणि तणावामुळेसुद्धा शरीरातील ऊर्जेवर परिणाम हाेताे.खूप श्रमाचे व्यायाम करणाऱ्यांना याेग्य आहाराअभावी दुखापती हाेण्याची जाेखीम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्टेराॅइड्सयुक्त प्राेटिन सप्लिमेंट्स, एनर्जी ड्र्निंस आणि कॅफिनयुक्त पेय-पदार्थांमुळे शरीरातील ऊर्जेची पातळी काही काळ वाढत असली, तरी मांसपेशी कमजाेर हाेऊन शरीर थकायला लागते. वैद्यकीय सल्ल्याशिवाय मल्टिव्हिटॅमिनच्या गाेळ्याही न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आपल्या आहारातूनच शरीराच्या गरज पूर्ण करणे हा सर्वांत साेपा नियम आहे.
 
त्वरित ऊर्जेसाठी उपाय :
 
 साधे पाणी प्यावे. थकव्याबराेबरच भूकही जाणवत असेल, तर केळे खावे. एखाद्या शांत जागी थाेडा वेळ बसावे.
 
 पाण्यात थाेडे मीठ, लिंबू आणि साखर टाकून ते प्यावे.त्यामुळे इले्नट्राेलाइट बॅलन्स व्यवस्थित राहताे.
 
 डार्क चाॅकलेटमधील ‘थियाेब्राेमाइन’ उपयुक्त ठरत असल्याने हे चाॅकलेट खावे.
 
 थाेडे स्ट्रेचिंग करण्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित राहून ऑ्निसजनचे प्रमाण वाढते.थकवा करा दूर थकवा दूर करण्यासाठी काही उपाय आहेत.मात्र, ते करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
 
 पाॅवर नॅप : दुपारी घेतलेल्या 20-30 मिनिटांच्या डुलकीमुळे थकवा दूर हाेताे. मेंदूला आवश्यक असलेला ब्रेक मिळताे. मात्र, ही डुलकी जास्त वेळ घेऊ नये. अन्यथा त्याचा परिणाम रात्रीच्या झाेपेवर हाेऊन दिवसा थकवा जाणवताे.
 
 कर्बाेदके : आहारात बटाटा, तांदूळ, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, तसेच साखर आणि साेडा यांचे सेवन कमी करावे. यात ग्लुकाेज असते आणि ते सेरेटाेनिनला ट्रिगर करते. आहारात प्रथिने असावीत.
 
 शिस्तबद्ध जीवनशैली : ठरलेल्या वेळी जेवा आणि झाेपा. त्यामुळे जैविक घड्याळ व्यवस्थित काम करते. कमी झाेपेमुळे थकवा वाढताे.
 
 कृत्रिम प्रकाश : सतत विजेच्या कृत्रिम प्रकाशात राहण्याऐवजी काही काळ नैसर्गिक प्रकाशात वावरणेयुद्धा फायद्याचे ठरते. थाेडा वेळ तरी माेकळ्या हवेत फिरावे. नैसर्गिक प्रकाशाच्या कमतरतेमुळे मेलाटाेनिनचे प्रमाण जास्त हाेऊन झाेप जास्त येते.
 
 मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्व : शरीरातील ग्लुकाेजची पातळी सामान्य ठेवण्याचे काम मॅग्नेशियम करते आणि त्याच्यामुळे मांसपेशी मजबूत हाेतात, फाेकस सुधारताे. त्यासाठी हिरव्या पानांच्या भाज्या आणि सुकामेव्याचे सेवन करावे. बी-1, बी-3, बी-5 आणि बी-6 ही जीवनसत्त्वे भाेजनाचे रूपांतर ऊर्जेमध्ये करतात.त्यासाठी चिकन, पनीर, सुकामेवा आणि अंड्यांचे सेवन करावे.
 
 पुरेसे पाणी प्या : पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी हाेऊन त्याचा परिणाम मेंदूला हाेणारा ऑ्निसजनचा पुरवठा कमी हाेताे. त्यातून थकवा येताे. त्यासाठी पुरेसे पाणी प्यावे आणि चहा, काॅफी, एनर्जी ड्रिंक अथवा काेलासारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन कमी करावे.
 
 जास्त वेळ बसणे : दीर्घकाळ एकाच जागी बसत असाल, तर अधूनमधून उभे राहा आणि थाेडे चाला. थकवा साठ टक्के कमी हाेताे.
 
 जीवनसत्त्व डी-3 : या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा वाढून ऊर्जा कमी हाेते.त्यासाठी थाेडा वेळ उन्हात बसा, अंड्यातील पिवळा भाग, संत्री आणि दुधाचे सेवन करावे.
 
 व्यायाम : नियमित व्यायाम करा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहून थकवा कमी हाेताे.