चेन्नईकरांची विजेची मागणी अख्ख्या केरळ राज्याइतकी

    23-May-2023
Total Views |
 
 


channai
 
 
उन्हाळा सुरू हाेताच चेन्नई शहरातील विजेची मागणी वाढली आहे. हे प्रमाण संपूर्ण केरळ राज्याच्या विजेच्या मागणीजवळ पाेहाेचल्याचे सांगितले जाते.चेन्नईत 20 एप्रिल राेजी विजेची मागणी विक्रमी 19,387 मेगावाॅटवर गेली हाेती आणि त्या दिवशीच्या सायंकाळी 423.785 दशलक्ष युनिट्स विजेचा वापर झाला हाेता. तमिळनाडू राज्य वीज मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून तसेच बाहेरच्या राज्यांतून चेन्नईत स्थायिक हाेण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने दरवर्षी विजेची मागणी वाढते आहे. 20 एप्रिल राेजी आलेली विजेची मागणी आणि प्रत्यक्षात झालेला युनिट्सचा वापर सर्वसाधारण वापरापेक्षा पन्नास टक्के अधिक हाेता. 20 एप्रिल राेजीच चेन्नई शहराने 3,778 मेगावाॅट विजेच्या मागणीचे शिखर गाठले हाेते. यात बृहत् चेन्नईमधील घरगुती, वाणिज्यिक आणि लघु उद्याेगांकडून आलेल्या मागणीचा समावेश असल्याचे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
‘तमिळनाडूतील जिल्हे तसेच देशाच्यअन्य राज्यांतून चेन्नईत स्थायिक हाेणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे विजेची मागणीही वाढत आहे. 2013 ते 2023 दरम्यान शहरातील विजेच्या मागणीत 25 टक्के आणि वापरात 60 टक्के वाढ झाली. 2013मध्ये शहराची विजेची मागणी 3,027 मेगावाॅट हाेती आणि यंदाच्या 20 एप्रिल राेजी ती 3,778 मेगावाॅटवर पाेहाेचली. संपूर्ण केरळची विजेची मागणी 4,500 मेगावाॅट असून, एकट्या चेन्नईची मागणी या आकड्याजवळ पाेहाेचत आली आहे,’ अशी माहिती तमिळनाडू राज्य वीज मंडळाचे (टीएनईबी) अध्यक्ष राजेश लखानी यांनी दिली. शहरातील विजेची जास्त मागणी घरगुती आणि नंतर वाणिज्यिक असल्याचे ते म्हणाले. वाणिज्यिक वापरासाठी विजेची मागणी वाढत असल्याबाबत लखानी म्हणाले, की शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर अंतरावर अनेक माेठी दुकाने उघडली जात आहेत.ती महापालिकेच्या हद्दीत येतात.
 
पूर्वी अण्णा सलाई आणि पेरिज काॅर्नर या भागांतच माेठी दुकाने हाेती. पण, आता टी. नगर हा नवा शाॅपिंग विभाग झाला आहे. तेथील अनेक दुकाने सकाळी लवकर उघडतात आणि तेथे विजेचे दिवे तसेच एअर कंडिशनर्सचा वापर हाेताे. या सर्व दुकानांना थ्री-फेज आणि सलग वीजपुरवठ्याची गरज असते. त्यातून विजेची मागणी वाढत असल्याचे लखानी यांनी नमूद केले. चेन्नईत अनेक माेठ्या कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहेत, त्यांनाही वीज द्यावी लागते. कांचिपुरम आणि तिरुवल्लूवर या जिल्ह्यांत अनेक मॅन्युफ्र्नचरिंग युनिट्स असली, तरी त्यांची मुख्य कार्यालये चेन्नईतच आहेत. त्यांनाही वीज पुरवावी लागत असल्याने शहरातील विजेची मागणी वाढत असल्याचे ते म्हणले. विजेच्या वाढत्या मागणीचा ताण येऊन ट्रान्सफाॅर्मर्स बिघडून वीजपुरवठा खंडित हाेताे. मात्र, आमचे कर्मचारी लगेच ट्रान्सफाॅर्मर्स बदलतात तसेच जास्त क्षमतेचे ट्रान्सफाॅर्मर्स लावतात. चेन्नईत असे काम माेठ्या प्रमाणात करण्यात आले असून, लवकरच भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे लखानी यांनी सांगितले.