दुपारी अर्धा तासच झाेपा; जास्त झाेपणे ठरेल प्राणघातक

    23-May-2023
Total Views |
 
 
 

Sleep
 
अनेक लाेकांना दुपारी एक -दाेन तास झाेपण्याची किंवा किमान एक तास ‘डुलकी’ घेण्याची सवय असते. दुपारी जेवल्यावर 15-20 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 30 मिनिटे झाेपणे स्फूर्तिदायक व लाभदायक असते. परंतु आता नुकत्याच केलेल्या अध्ययनाच्या निष्कर्षानुसार अर्धा तास किंवा यापेक्षा जास्त वेळ दुपारी झाेपणे प्राणघातक ठरू शकते. कारण दुपारी जास्त वेळ झाेपल्यास हृदयाची समस्या निर्माण हाेऊ शकते व हाय बीपीचा त्रास हाेऊ शकताे. हृदयाचे ठाेके अनियमित हाेऊ शकतात. म्हणजे हार्टअ‍ॅटक येण्याचा धाेका 5 पटीने वाढताे.दरराेज दुपारी 30 मिनिटे किंवा यापेक्षाजास्त वेळ झाेपणे हृदय विकाराचे कारण बनू शकते. जगात 4 काेटींपेक्षा जास्त लाेक या स्थितीचा सामना करीत आहेत. शास्त्रज्ञांनी 20,000 पेक्षा जास्त लाेकांच्या डाटाचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.
 
या अध्ययनात भाग घेणाऱ्या लाेकांचे 3 गट तयार करण्यात आले. पहिल्या गटात दिवसा झाेप न घेणारे लाेक, दुसऱ्या गटात दरराेज नियमित दुपारी कमीत कमी 30 मिनिटे झाेपणारे व तिसऱ्या गटात 30 मिनिटांपेक्षा जास्त झाेपणाऱ्या लाेकांचा समावेश करण्यात आला हाेता. जे लाेक दुपारी 30 मिनिटे किंवा यापेक्षा जास्त वेळ झाेप घेतात त्यांना हार्टअटॅक येण्याचा धाेका 5 पट जास्त असल्याचे निष्पन्न झाले. पण काही मिनिटे डुलकी घेणाऱ्या लाेकांना जास्त धाेका नसल्याचे निष्पन्न झाले.जे लाेक रात्री झाेपू शकत नाहीत, नाइट शिफ्ट करतात, अशा लाेकांना डुलकी घेण्याचा फायदा हाेताे, असेही आढळून आले आहे. तुम्ही दुपारी जास्त वेळ झाेपणे नुकसानकारक ठरू शकते. सर्वाेत्तम डुलकी 15 ते 30 मिनिटांची आहे.