स्काॅटलंडमध्ये दीड काेटी रुपयांत विकले जात आहे सुंदर प्रायव्हेट बेट

    23-May-2023
Total Views |

Scotland
 
स्काॅटलंडमध्ये एक खासगी बेट विक्रीसाठी तयार आहे. दक्षिण किनाऱ्यावर बार्लाेकाे बेटाजवळ एका बेटाला गालब्रेथ समूहाने ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. 25 एकरांमध्ये पसरलेल्या या बेटाची किंमत 1.5 काेटी रुपये आहे. इथे पाण्याच्या रूपात एक माेठा तलाव आहे.पण, इमारत किंवा वीज नाही.लंडनपासून 563 किलाेमीटर दूर या बेटावर असलेले पाणी आयरिश समुद्राचा हिस्सा आहे. इथून जवळच्या शहराचे अंतर सुमारे नऊ किलाेमीटर आहे.या बेटापासून लंडन 563 किलाेमीटर अंतरावर आहे, तर एडिनबर्ग 160 किलाेमीटर दूर आहे. बेटावर असंख्य प्रकारचे वन्यजीव आहेत.
 
त्यांच्यात ग्रेट ब्लॅक-बँक गुलसुद्धा सामील आहेत. इथे राॅक सी लॅव्हेंडर आणि ऑर्किड यासाख्या दुर्मीर्ळ वनस्पतीही आहेत.पायीसुद्धा जाता येईल बेटावर असलेला तलाव हिवाळ्यात प्राणी आणि इतर प्रजातींसाठी पाण्याच्या स्राेताचे काम करताे. इथे एक समुद्रकिनारासुद्धा आहे. तिथे ओहाेटीच्या वेळी चालतही जाता येते. तसेच, भरतीच्या वेळी पाणी जास्त असल्यास एका नावेची गरज पडते. हे बेट पक्ष्यांना पाहणे, मासे पकडणे, माेठ्या सहलीला जाणे यासाठी एक आदर्श ठिकाण आहे.विक्रीची जबाबदारी सांभाळणाऱ्या गालब्रेथ समूहाचे प्रमुख आराेन एडगर यांनी सांगितले की, ब्रिटन, इटली, जर्मनी, नाॅर्वेे आणि अमेरिका येथून या मालमत्तेविषयी चाैकशी करण्यात आली आहे.
 
 हे बेट 25 एकरांचे आहे आणि बार्लाे काे बेटाजवळ आहे.
 राॅक सी लॅव्हेंडर आणि सुगंधी ऑर्किड या वनस्पतींनी भरले आहे बेट.
 जवळचे शहर आहे 9 किलाेमीटर अंतरावर.