भाविकांना रेणुका देवीचे दर्शन हाेणार सुकर : नितीन गडकरी‘

    23-May-2023
Total Views |
 
 
Nagpur
 
नागपूरहून माहूरला पाेहाेचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागत.आज नागपूर ते माहूर अंतर अवघ्या अडीच तासांत पार करणे सुकर झाले आहे. माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा हाेती, ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद हाेत आहे,’ अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्य्नत केली.श्री क्षेत्र माहूरगडावर आबालवृद्धांसह दिव्यांग व सर्व भ्नतांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवाॅक बांधकाम याेजनेच्याभूमिपूजनप्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माहूर येथे त्यांनी सपत्निक श्री रेणुका देवीची पूजा करून माहूरच्या विकासाला व राेजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्री क्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी श्रीकृष्ण काेकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भाेसले, माहूरचे नगराध्यक्ष फेराेज दाेसानी, व्यंकटेश गाेजेगावकर, श्री रेणुका संस्थानचे सर्व विश्वस्त या वेळी उपस्थित हाेते.
 
माहूरला वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डाेंगराळ भाग असल्याने पर्यटनासाठीही माेठी संधी उपलब्ध आहे. माहूरच्या पायथ्याशी माेठा तलावही आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून येथे तलावातील पाण्याची पातळी चार मीटरपेक्षा अधिक आपण आणू शकलाे, तर या विस्तारित तलावाच्या पाण्यावर प्रवासी विमानसेवाही आपण उपलब्ध करू, असा विश्वास गडकरी यांनी व्य्नत केला.किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांतील शेतकरी व युवकांना स्वयंराेजगाराच्या कक्षेत आणण्यासाठी पर्यटन, कृषी पर्यटन व इतर शेतीपूरक उद्याेगांशिवाय पर्याय नाही. या दृष्टीने सर्वच पातळ्यांवर एकत्रित विचार हाेऊन सामूहिक कृतीची आवश्यकता असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. किनवट, माहूर या भागात रस्त्यांचे उत्तम जाळे निर्माण करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली. माहूर : गडावरील लिफ्ट व स्कायवाॅक प्रकल्पाच्या काेनशिलेचे अनावरण करताना नितीन गडकरी व मान्यवर.