स्कीझाेफ्रेनिया हा एक सामान्य परंतु अन्य राेगांना आमंत्रण देणारा राेग आहे.या राेगाच्या कचाट्यात येऊन शरीर कमजाेर पडते. याच्या परिणामाने अन्य राेगही शरीराला घेरू लागतात. हा एक मानसिक राेग आहे.स्कीझाेफ्रेनिया राेगाची लक्षणे सुरुवातीला समजून येत नाहीत.सामान्यतः दिनचर्येमध्ये परिवर्तन हाेऊ लागते आणि याचे कारण समजून येत नाही. यामध्ये राेग्याची झाेप पूर्णपणे उडते अथवा याचा राेगी नियमित रूपात झाेपू शकत नाही. याखेरीज भाेजनात अरुची उत्पन्न हाेते. भाेजनात मन लागत नाही. तसेच काेणत्याच कामात मन लागत नाही. राेगी एकाकी राहू लागताे. स्थिती एकदम भावशून्य हाेते.
एखाद्याशी वार्तालाप करण्यात व लाेकांत मिसळण्यात अवघड जाते.याचबराेबर मनामध्ये एकप्रकारे भीती राहते. ज्याच्या कारणाने राेगी एकटाच बडबडत राहताे आणि नकाे त्या गाेष्टींची शंका करू लागताे. तसे या राेगासाठी काही खास कारणे जबाबदार नाहीत. वैय्नितक जीवनाने त्रस्त हाेऊन व्य्नती तणावामध्ये येते आणि राेगाची शिकार हाेते. हा राेग एखाद्या मानसिक आघातानेही हाेताे. याखेरीज कुटुंबात सतत तणाव राहिल्यास अशा स्थितीत हा राेग हाेण्याची अधिक श्नयता राहते.नशिल्या पदार्थांचे नियमित सेवन, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि आनुवंशिक कारणे यांनीही स्कीझाेफ्रेनिया हाेऊ शकताे.