शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्याचे रहस्य शाेधून काढले

    23-May-2023
Total Views |
 
 


Life
 
 
आपल्या शरीरातील पेशी वय वाढते तशा कमी हाेऊ लागतात. यामुळे शरीर कमजाेर-म्हातारे हाेते. स्फूर्ती कमी हाेते. परंतु आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी सिंथेटिक जेनेटिक ्नलाॅकचा वापर करून पेशींचे आयुष्य वाढविण्याचा व दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा उपाय शाेधून काढला आहे.कॅलिफाेर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सॅक्राेमायसेस सेरेव्हिसिया नावाच्या यिस्टवर अध्ययन केले. शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, पेशींचे आयुष्य वाढल्यामुळे माणूस अमर हाेईल असे नाही पण यामुळे थाेडे आयुष्य न्नकीच वाढेल. शास्त्रज्ञांना पेशींचे आयुष्य सरासरी 82% वाढविण्यात यश मिळाले आहे.
 
यामुळे वयाच्या संदर्भात आजारांचा इलाज करणे श्नय हाेईल. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी सेल एजिंग सर्किट कसे काम करते हे पाहण्यासाठी काॅम्प्युटर माॅडेलिंगचा वापर करून सेल एजिंग सर्किटसाठी एक ट्विक डिझाइन लागू केले.जेणे करून पेशींचे आयुष्य दाेन वेगवेगळ्या स्टेज दरम्यान राहील. यामुळे माणसाचे वय पूर्वीच्या तुलनेत उशिरा वाढेल. हे अध्ययन करणारे शास्त्रज्ञ म्हणाले की, यिस्टपेशी मानवी पेशींशी मिळत्या जुळत्या असतात. त्यामुळे संशाेधनात याचाच वापर हाेताे.