सासरी काम, माहेरी आराम

    23-May-2023
Total Views |

sasar
 
 माहेर हे आरामाचं ठिकाण नाही: तुम्ही माहेरी जर मुलांच्या सुट्ट्या म्हणून आला असाल तर त्या घरातील इतरांचा वेळ, त्यांची राेजची कामं यात आपला अडथळा हाेणार नाही ना हे आवर्जून पाहिलं पाहिजे.शिवाय राेजच्या दैनंदिन कामात हातभार लावू शकता. तुम्हाला जशी आरामाची गरज आहे तशीच ती इतरांना ही आहे हे लक्षात असू द्या.
 
 आरामाची सर्वांना सारखीच आवश्यकता: तुम्ही जेव्हा माहेरी येता तेव्हा त्या घरातल्यावर अतिरिक्त जबाबदारी येते. अनेकदा आई वडील आज मुलाचं काही पाहणार नाही. मात्र माहेरी आलेल्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आटापिटा करतात. यामुळे अनेकदा मुलगा मुलगी असा त्यांच्या नकळत सुद्धा अजा दुजा भाव केला जाताे.
 
 सर्व कामात मदत: आज अनेक स्त्रियांना स्वयंपाक करण्यात किंवा ती कामं करायला नकाेशीं असतात. अशा वेळेस तुम्ही बाहेरची किंवा भावजयीच्या मुलांना सांभाळण्याचं काम करू शकता. त्यामुळे हसत खेळत काम हाेईल आणि काेणा एकावर कामाचा बाेझा येणार नाही.
 
 नणंद म्हणजे सतत काहीतरी हवं: आज आईवडील मुलींना खूप लाडात वाढवतात. त्या माेठ्या झाल्या तरी हे लाड काही संपत नाही.आणि त्या तुलनेत मुलाचे लाड केले जातील असं मात्र हाेत नाही. त्याला कशाला काही हवं जे आमचं आहे ते आम्ही गेल्यावर त्याचंच हाेणार हे वाक्य ेकलं की सर्वजण आपाेआप गप्प बसतात, हे त्यांना माहीत असतं.त्यामुळे नणंद म्हणजे फक्त लुबाडते हा समज तुम्ही खाेडून काढू शकता.