मेष

    22-May-2023
Total Views |
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीने भरलेला असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा तणावाचा राहणार आहे. तुम्हाला घरातील एखाद्या व्यक्तीविषयी थाेडी चिंता असण्याची श्नयता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणींना सामाेरे जावे लागू शकते. दांपत्यजीवन सुखमय राहणार आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : नाेकरदारांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहणारा आहे. काही बाबतीत नशीबही तुम्हाला साथ देणार आहे. विद्यार्थ्यांना या आठवड्यात यश मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागू शकते. स्वत:च्या परिश्रमाच्या बळावर तुम्ही काेणतेही काम यशस्वी करू शकाल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवन संमिश्र स्वरूपाचे राहू शकते.तुम्हाला तुमच्या मित्र व आप्तेष्टांकडून हवी तशी मदत न मिळाल्यामुळे तुम्ही काहीसे नाराज राहू शकता. कुटुंबीयांची तब्बेत तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते. एखाद्या नातलगाकडून दु:खद बातमी कळू शकते. घरात मंगलकार्य घडू शकते.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहणार आहे. उत्तम आराेग्यामुळे तुमची मन:स्थितीही चांगली राहील. हवामान बदलामुळे छाेट्या- माेठ्या समस्या तुम्हाला त्रास देण्याची श्नयता आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे थाेडासा मानसिक दबाव राहू शकताे. तुम्ही तुमचे आराेग्य सांभाळावे.
 
 शुभदिनांक : 21, 24, 27
 
 शुभरंग : रविवार, बुधवार, शनिवार
 
 शुभवार : रविवार, बुधवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात रागावर ताबा ठेवावा. वाद घालणे टाळावे.
 
 उपाय : या आठवड्यात सर्व संकटे दूर हाेण्यासाठी राेज हनुमान उपासना करावी व सुंदरकांड वाचावे.