तूळ

    22-May-2023
Total Views |
 

Horoscope 
 
 
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाची फळे देणारा राहणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी एकाग्रता राखायला हवी, तरच ते यश मिळवू शकतात.व्यापार वा व्यवसायासंबंधित अनुभव मिळवण्यासाठी लाेकांना भेटू शकता.एखाद्या माेठ्या अधिकाऱ्याची मदतही मिळू शकते.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन चमकू शकते.नाेकरीत बदलीही हाेण्याची श्नयता आहे. ऑफिसात सीनियर्सच्या मदतीने तुम्ही यशाच्या पायऱ्या चढू शकला; पण त्यासाेबतच ऑफिस वा कार्यस्थळावर तुम्हाला विराेधकांपासून सांभाळून राहायला हवे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरातील मंडळींसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. मुलांसाठी पैसा खर्च करावा लागू शकताे.तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे नातेवाईक तुमच्यापासून दुरावू शकतात. आई- वडिलांसाेबत एखाद्या धार्मिक स्थळाची यात्रा करण्याचा याेग आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आराेग्यासंबंधित आव्हानांचा सामना करावा लागू शकताे. तुम्ही टायफाइड, डेंगू, चिकन गुनिया वा इतर प्रकारच्या तापाच्या तावडीत सापडू शकता. आराेग्याबाबत पूर्णपणे सावध राहण्याची गरज आहे.
 
 शुभदिनांक : 23, 25, 26
 
 शुभरंग : पिवळा, निळा, हिरवा
 
 शुभवार : मंगळवार, गुरुवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही नवे काम करण्यापूर्वी त्यातील बारकावे समजून घ्या.
 
 उपाय : या आठवड्यात दुर्गादेवीच्या पूजेत चालिसा वाचा. शुक्रवारी पांढऱ्या कापडात तांदूळ ठेवून दान करा.