या विकारांवर तातडीने उपचार करावेत !

    22-May-2023
Total Views |
 
 
 

Health 
 
सामान्यपणे लाेक तब्येत खराब झाल्यास वेदनानिवारक गाेळ्या घेऊन आराम मिळवितात. परंतु यामुळे काही समस्या आपणास नेहमी त्रस्त करतात. त्यांकडे दुर्लक्ष करू नये. कारण यांकडे दुर्लक्ष केल्यास त्या गंभीर रूप धारण करू शकतात.
 
वजन कमी हाेणे आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न न करता शरीराचे वजन कमी हाेत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. थायराॅइडअथवा पाचनतंत्रामध्ये बिघाड हाेण्याकारणाने ही समस्या हाेऊ शकते. त्यासाठी त्वरित डाॅक्टरांकडून तपासणी करवून घ्यावी.डाेकेदुखीनेहमी उन्हामध्ये िफरणे, दीर्घ काळ रिकाम्यापाेटी राहाणे, अधिक वेळ काॅम्प्युटरवर काम करणे, तसेच झाेप पूर्ण न हाेणे यामुळेही समस्या हाेते. डाॅक्टरांनुसार सतत डाेकेदुखी हाेत असेल तर ही मायग्रेनची तक्रारही असू शकते.
 
थकवा - थकवा येणे हा जर दैनंदिन जीवनाचा भाग झाला असेल तर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. कायम थकावटीमुळे डिप्रेशन, स्मरणशक्ती कमी हाेणे, ब्लड पे्रशर आणि हृदयराेग हाेण्याचा धाेका हाेऊ शकताे. त्यासाठी रक्ताची तपासणी करावी.
 
पाेटदुखी - सतत पाेटदुखी हाेत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. डाॅक्टरांच्या अनुसार एखाद्या प्रकारचे संक्रमण, खडा, अथवा पँक्रियाजमध्ये सूज येणे यामुळेही पाेटदुखी हाेऊ शकते.