मिथुन

    22-May-2023
Total Views |
 
 
 

Horoscope 
हा आठवडा व्यापारी परिस्थितीत सकारात्मक बदल घडवील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही नवे साैदे करण्याची संधी मिळू शकते. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. जर तुम्ही एखादा बिझनेस सुरू केला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश प्राप्त हाेईल. नाेकरदारांसाठी बढतीचे याेग आहेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरनुसार उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागू शकतात. तुम्ही तुमचे कम्युनिकेशन स्किलकडे जास्त लक्ष द्यायला हवे. यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम संबंध बनवण्यात यशस्वी व्हाल. व्यापारात लाभाची पूर्ण श्नयता आहे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसाेबत उत्तम वेळ घालवाल.जर संतती विवाहयाेग्य असेल, तर उत्तम स्थळ चालून येऊ शकते. घरात काेणत्याही प्रकारची अशांती चालू असेल, तर तीही दूर हाेईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयीच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित समजता.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमची आराेग्यविषयक स्थिती संमिश्र स्वरूपाची राहणार आहे. तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अंगात आळस संचारणार नाही, असा प्रयत्न करावा. थकवा जाणवत असेल, तर स्वत:च्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन याेग्य ते बदल करावेत.
 
 शुभदिनांक : 21, 25, 27
 
 शुभरंग : आकाशी, हिरवा, लाल
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम करताना संयम बाळगणे आवश्यक आहे.
 
 उपाय : या आठवड्यात राेज शंकराची पूजा करावी व त्याची चालिसा वाचावी.शनिवारी शनीसंबंधित लाेखंड, सरसू तेल व काळे तीळ इ. दान करावेत.