मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाईसंदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नाेंदवण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी.कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारींसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसवण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरांतील नालेसफाईची पाहणी केली. चार तासांहून अधिक काळ हा पाहणी दाैरा सुरू हाेता. एके ठिकाणी मुख्यमंत्री स्वत: नाल्याच्या पात्रात उतरले आणि त्यांनी कामाची पाहणी करत सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.दरम्यान, अंधेरीतील गाेखले पुलाचे काम ऑक्टाेबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी मिलन भुयारी मार्ग (सांताक्रुझ), गाेखले पूल (अंधेरी पूर्व), ओशिवरा नदी (लिंक राेड, अंधेरी पश्चिम), पाेयसर नदी, लिंक राेड (कांदिवली पश्चिम), दहिसर नदी (आनंदनगर पूल), दहिसर पूर्व व पश्चिम नदी पुनरुज्जीवन (बाेरिवली पूर्व), श्रीकृष्णनगरालगत संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य (बाेरिवली पूर्व) येथे पाहणी केली.मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली असून, सध्या 450 कि.मी. रस्त्यांचे काम सुरू झाले आहे; तर 400 कि.मी.च्या कामांची प्रक्रिया सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईच्या सुशाेभीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लाेढा, खासदार गाेपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनीषा चाैधरी, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, अमित साटम, प्रकाश सुर्वे, मुंबईचे आयु्नत इक्बालसिंह चहल, अतिर्नित आयु्नत (प्रकल्प) पी. वेलरासू आदी या वेळी उपस्थित हाेते.