आयुर्वेदाप्रमाणे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केली तर तुमच्या जीवनशैलीत माेठा बदल हाेऊ शकताे. आयुर्वेदाच्या मते, सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठणं चांगलं असतं. याचा अर्थ असा की, सूर्याेदयापूर्वी दाेन तास आधी उठणे.याचं कारण म्हणजे असं केल्यानं तुम्हाला तुमच्या दिवसाची याेग्य सुरुवात करण्यास पुरेसा वेळ मिळताे. सकाळी झाेपेतून उठल्यावर चेहऱ्यावर पाणी मारणं आवश्यक आहे. चेहऱ्यावर पाणी मारल्याने डाेळ्यांचा चांगला व्यायाम हाेताे, असं मानल जातं. पण चेहऱ्यावर वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान आणि वातावरणाचं तापमान सारखं असावं. पाणी जास्त थंड किंवा जास्त गरमही नसावं. दरराेज शाैचाला जाण्याची वेळ निश्चित करावी, जेणेकरून तुम्हाला पाेट किंवा आतड्यांच्या संबंधित समस्यांना सामाेर जावं लागणार नाही. रात्रभर झाेपल्यानंतरही सकाळी उठल्यावर जर तुम्हाला बाथरुमला जाण्याची गरज भासत नसल्यास याचा अर्थ तुम्हाला आणखी झाेपेची गरज आहे. सकाळी उठल्यावर पाेट साफ झाल्याने शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर टाकली जातात.
असं केल्यास शरीर ताजतवानं आणि एनर्जेटिक राहत. ताेंड आणि जिभेच्या स्वच्छतेकडे आयुर्वेद सर्वांत जास्त लक्ष देतं. ओरल कॅविटी म्हणजे तुमचं ताेंड स्वच्छ आणि निराेगी राहणं यासाठी तुमचा टूथब्रश साॅफ्ट असणं आवश्यक आहे.इतकंच नाही तर तुमच्या टूथपेस्टची चव थाेडी कडवट असावी. आयुर्वेदानुसार गुळण्या राेज केल्या गेल्या पाहिजेत. पाण्यात मीठ घालून राेज गुळण्या केल्याने ताेंडात असलेल्या साॅफ्ट टिशूची सफाई हाेते. दरराेज तेलाने शरीराची मालिश केली पाहिजे, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. कारण तेल हे सर्वांत चांगले माॅइश्चरायझर आहे. अंघाेळीच्या आधी बेंबी, पायाचा तळवा, डाेके, कान, हात आणि काेपर या अवयवांची तेल लावून मालिश करावी. मालिश करताना ऑलिव्ह तेल, नारळाचं तेल, माेहरीचं तेल किंवा तीळाच्या तेलाचा वापर करावा. सकाळी वर्कआऊट करायला हवा, असं केल्यानं शरीरातील रक्त प्रवाह वाढताे आणि शरीराची लवचिकता वाढते.