दिवसभराचा आदर्श आहार कसा असावा ?

    20-May-2023
Total Views |
 
 
 

food 
सकाळचा नाश्ता: अनेक लाेक सकाळचा नाश्ता करणं महत्त्वाचं समजत नाहीत. मात्र असं नाही, तर सकाळच्या न्याहारीमुळे दिवसभर काम करण्याची उर्जा तुम्हांला मिळाली पाहिजे.न्याहारीमध्ये ायबर जास्त असेल याचा विचार केला पाहिजे. यामुळे पाेट साफ राहतं आणि जडपणा येत नाही, काम करण्यास सुद्धा उत्साह वाटताे. त्यासाठी न्याहारीमध्ये दूध, फळाचा ज्यूस, अंकुरित कडधान्य, सँडविच, पाेहे, उकडलेली अंडी, दलिया, उपमा तुम्ही घेऊ शकता.
 
दुपारचे जेवण: दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, डाळी अवश्य असल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असे प्राेटीन आणि जीवनसत्त्वे तुम्हांला मिळतील.याशिवाय जास्तीतजास्त ायबर असणं गरजेचं आहे. यामुळे सर्व पाेषक घटक तर मिळतील; शिवाय वजनसुद्धा वाढणार नाही.जर तुम्ही नाॅन व्हेज खात असाल तर तुमच्यासाठी मासे आणि चिकन एक चांगला पर्याय हाेऊ शकताे.
 
रात्रीचं जेवण: रात्री खूप जड अन्नपदार्थ घेऊ नयेत. रात्री खाण्यापूर्वी तुम्ही सूप घेऊ शकता यामुळे जेवण लवकर पचण्यास मदत हाेते. नाॅन व्हेज खाणाऱ्या लाेकांनी कमी तेलात बनवलेलं जेवण किंवा राेस्टेड मासे खाऊ शकता. आहारात साखर, बटाटा, भात तसंच जास्त कार्बाेहायड्रेट्स असणारे पदार्थ कमी घेतले पाहिजेत. जेवण झाेपण्यापूर्वी दाेन तास आधी हाेईल याची काळजी घेतली पाहिजे. जेवण करताना कधीच टीव्हीसमाेर बसून जेवू नका.