घर हे भिंतीनीच बनलेलं असतं.त्यामुळेच जर घराचं साैंदर्य वाढवायचं असेल तर भिंतीच्या सजावटीकडे विशेष लक्ष द्यायला हवं. भिंतीचं कलात्मक रूप न्नकीच तुमच्या घराची शाेभा वाढवेल. त्याचबराेबर तुमचं मनही प्रसन्न हाेईल. बेडरूम, हाॅल, मुलांची खाेली, बाथरूमच्या भिंतीवर लावण्यासाठी सध्या बाजारात अनेक गाेष्टी आहेत, त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार न्नकीच निवडू शकता.कॅडल हाेल्डर व स्काॅन्स कँडल हाेल्डर तुमच्या खाेलीच्या सजावटीला चार चाँद चढवेल. या हाेल्डरवर रंगीत, डिझायनर मेणबत्त्या ठेवा. यामुळे खाेलीत मंद प्रकाश पसरेल. मेणबत्तीशिवाय तुम्ही मंद प्रकाश असणाऱ्या स्काॅन्सचा वापरही करू शकता. खाेलीचं साैंदर्य आणखी वाढविण्यासाठी खाेलीच्या काेपऱ्यामध्ये फ ुलदाणी ठेवा.वाॅल आर्किटेक्चर पीसेस वाॅल आर्किटेक्चर तुमच्या निर्जीव भिंतीम ध्ये सजीवता न्नकीच आणेल.
खाेलीतील भिंतींच्या रंगानुसार वाॅल आर्किटेक्चरची निवड करा. प्राचीन शिल्पांचाही तुम्ही सजावटीसाठी वापर करू शकता. यामुळे खाेलीची भव्यता वाढेल.वाॅल क्लाॅक प्रत्येक खाेलीमध्ये घड्याळ ही एक अत्यावश्यक गरज असते, मग तेच घड्याळ थाेडं कलात्मक निवडलं तर खाेली अधिक सुंदर दिसेल. सध्या बाजारात विविध आकारात, रंगात आणि प्रकारात घड्याळं उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या खाेलीचा रंग व इतर सजावट याला साजेसं घड्याळ निवडून खाेलीच्या साैंदर्यात भरघालू शकता.मेटल वाॅल आर्ट मेटल आर्टमध्ये आपल्या देवीदेवतांच्या वेगवेगळ्या रूपातील तसबीरींपासून ते माॅडर्न आर्टमधील कलाकृतींपर्यंत असंख्य व्हरायटी बघायला मिळते. ही व्हरायटी डिझाइनमध्ये तर असेतच याशिवाय वेगवेगळ्या धातूंचा वापरही केलेला असताे. त्यामुळे तुमचं बजेट, रंगाची आवड यानुसार खरेदीला भरपूर वाव आहे.