पतीला असहाय बनवू नका

    20-May-2023
Total Views |
 
 

Marriage 
 
संसाराचा गाडा पती-पत्नी दाेघे मिळून चालवत असतात. पतीचे काम कमावणे असते, तर पत्नीचे खर्च करणे. कमावण्यापेक्षा खर्च करण्याची पद्धत जास्त महत्त्वाची असते. प्रेमविवाह केलेल्या पत्नी आपल्या पतीच्या हातात राेज आपल्या फर्माइशींची लांबलचक यादी देत असतात. कारण त्याने लग्नापूर्वी तिला अनेक स्वप्ने दाखवलेली असतात, आणि आता ती स्वप्ने नवऱ्याने पूर्ण करावीत असे तिला वाटत असते तर तिने स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून वास्तव जगात यावे असे पतीला वाटत असते.सामान्यत: महिला आपल्या शेजारणीचा मत्सर करीत असतात.त्यांना आपल्यापेक्षा चांगल्या कपड्यात पाहू शकत नसतात. पण त्या आपल्या आणि शेजारणीच्या पतीच्या पगारातील फरकाचा विचार करीत नसतात. खरे तर आपल्या पतीच्या उत्पन्नाप्रमाणेच आपल्या मागण्या असायला हव्यात. इतरांचे पाहून आपल्या गरजा वाढवणे याेग्य नव्हे. बजेटपेक्षा जास्त मागण्या करून आपल्या पतीला संकटात टाकू नये.आपल्याकडे जे आहे ते स्वीकारून समाधानात राहायला हवे. तरच आपला संसार सुखाने चालू शकेल.
 
भाैतिक सुखसाधनांचा काेणताही अंत नाही. जगात एकाहून एक श्रीमंत आहेत. त्यांची बराेबरी करण्याचा विचार करण्याऐवजी आपल्या परिस्थितीनुसार राहावे. जेवढे उत्पन्न असेल तेवढ्यातच खर्च करावा.मागण्या काय कितीही केल्या तरी कमीच पडत असतात. आजच्या जगात लाख रूपये पगार असला तरी ताे खर्च व्हायला वेळ लागत नाही. पण सतत नवनवीन मागण्या करण्यापूर्वी काेणती मागणी याेग्य आणि गरजेची आहे, याचा विचार करायला नकाे का? माेठ्या शहरांत आजकाल ऊठसूट हाॅटेलात जेवायला जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. नाेकरदार पती आपल्या पत्नी व मुलांच्या इच्छेपाेटी त्यांना हाॅटेलात नेताे, पण त्याचें बील देताना त्यांला घाम फुटत असताे. हाॅटेलमधील एका वेळच्या जेवणाच्या पैशात आपण घरात चार दिवस जेवू शकता.क्वचित कधी तरी हाॅटेलात जायला काहीच हरकत नाही. पण असे ऊठसूट हाॅटेलात जाऊन आपल्या खर्चाचे बजेट बिघडवणे याेग्य नव्हे. असे अनेक खर्च टाळले पाहिज