राेजगारयुक्त महाराष्ट्रासाठी व्यवसाय समुपदेशन शिबिरे महत्त्वाची

    20-May-2023
Total Views |
 
 

Employment 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास मान्यवरांची उपस्थिती जास्तीत जास्त राेजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून, कुशल आणि राेजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहूमहाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरे नक्कीच माेलाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री शिंदे बाेलत हाेते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
 
या वेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर, काैशल्य, उद्याेजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लाेढा, खासदार जे. पी. नड्डा, खासदार मनाेज काेटक, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार मनीषा कायंदे, काैशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, काैशल्य विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, काैशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ.अपूर्वा पालकर आणि आदी मान्यवर या वेळी उपस्थित हाेते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करताेय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते.देशाची अर्थव्यवस्था 11व्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे.सध्या देशात जी-20च्या बैठका सुरु आहेत.जी-20चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही देशासाठी गाैरवाची बाब आहे.
 
देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनालागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती तसेच राेजगाराच्या विविध संधी याची माहिती तसेच पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहाेत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात 75 हजार नाेकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.बार्टी, सारथी व महाज्याेती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 1 लाख 25 हजार राेजगार उपलब्ध हाेण्यासाठी विविध संस्थांसाेबत करार करण्यात आले आहेत.आगामी काळात तीन लाख राेजगार निर्माण करण्यात येतील. मुंबई महापालिका शाळांमध्ये काैशल्य विकास केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे मंत्री लाेढा यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच महापालिकेच्या 100 शाळांमध्ये काैशल्ययुक्त शिक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.