सर्वांत माेठे जहाज अंतिम टप्प्यात

    20-May-2023
Total Views |
 
 
 
Boat
 
फिनलॅन्डमधील मेयर टुर्कू शिपयार्डमध्ये जगात सर्वांत माेठे जहाज तयार हाेत असून, आता त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.हे जहाज बांधण्याचा आतापर्यंत 1.2 अब्ज पाैंड (122 अब्ज 87 काेटी रु.) खर्च झाला आहे. फिनलँडची राॅयल कॅरेबियन आयकाॅन ऑफ द ‘सीज’ ही कंपनी गेल्या 6 वर्षांपासून हे जहाज तयार करीत आहे. हे जहाज बांधण्यासाठी 300 पेक्षा जास्त कामगार अहाेरात्र काम करीत आहेत. या जहाजासाठी 12000 किलाेमीटरच्या ऑनबाेर्ड केबल्स वापरण्यात आल्या आहेत. या जहाजाचे जलावतरण मियामी येथे हाेणार आहे. या जहाजात एका वेळी 76 हजार प्रवासी राहू शकतील.