राज्यात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आराेग्य या क्षेत्रात माेठी संधी असून, अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसाेबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्य सचिव मनाेज साैनिक या वेळी उपस्थित हाेते.दाेन्ही देशांत व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत.
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, राज्यातील कृषी, मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळआदींबाबत या वेळी चर्चा झाली.या वेळी शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पाेपाहारात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश हाेता. गारसेट्टी खवय्ये असल्याने खासकरून मुंबईची ओळख असलेल्या वडापावचाही अल्पाेपाहारात समावेश हाेता.मुख्यमंत्र्यांनी गारसेट्टी यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि ताे आवडल्याची प्रतिक्रियाही दिली.