काेलंबियाचे प्रसिद्ध कलाकार एडिसन कॅमाचाे यांनी गाडीच्या टायरपासून अनेक आकर्षक कलाकृती तयार करून पर्यावरण प्रदूषणाबाबत संदेश दिला आहे. त्यांनी सॅन फ्रान्सिस्काेमधील डी-सेल्स येथे एक म्युझियम तयार केले आहे. या संग्रहालयातील सर्व आकृत्या रिसायकल सामग्री वापरून तयार केल्या आहेत. या म्युझियममध्ये डायनासाेर, चिंपांझी, हरीण, बारशिंगा, कारजवळ उभा असलेला माणूस अशा अनेक आकृत्या मरियाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केल्या आहेत.