उचकी लागण्याचे कारण काय?

    08-Apr-2023
Total Views |
 
 

Health 
जेवता जेवता काेणाला उचकी लागली की तर असं म्हटले जातं की काेणीतरी आठवण काढतंय. परंतु याचे शास्त्रीय कारण काय आहे ते पाहू या.छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा असताे. हा स्नायूंचा बनलेला असताे. कधी कधी अकस्मात या स्नायूंचे आकुंचन हाेते. हे आकुंचन बऱ्याचवेळा एका पाठाेपाठ हाेत राहते.अशा आकुंचनानंतर स्वरयंत्रणेतील पट्ट्या एकमेकांजवळ येतात. या घटनेला उचकी लागली असे म्हटले जाते.उचकीचा त्रास स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक हाेताे. उचकी सहसा आपाेआपच थांबते. कधी कधी दीर्घ काळ याचा त्रास हाेत राहताे. उचकी ही एक प्रतिक्षिप्त क्रिया असते. या क्रियेचे केंद्र मेंदूतील ब्रेनस्टेम या भागातील खालच्या भागात असते.फ्रेनिक या शिरेतून विभाजक पडद्याला उत्तेजन मिळते व ते स्नायू आकुंचन पावतात.
 
उचकी या प्रकारात स्नायूंचे काही तंतू आकुंचन पावतात व वारंवार ते घडते. विभाजक पडद्याच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्वास नलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया हाेते. परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्याने माेठ्याने आवाज हाेताे.उचकी लागत असताना श्वास बाहेर पडत असताते त्या तेवढ्या दरम्यान श्वास आत घेता येत नाही. त्यामुळे व्य्नतीला अस्वस्थपणा जाणवताे.उचकीवर उपाय : लहान मुलांना मध चाटण्यास देतात. उचकी लागली की दीर्घ श्वास घ्या उचकी थांबण्यासाठी असे दाेन तीन वेळा करा. तुम्ही जेव्हा श्वास राेखून ठेवता तेव्हा फुफ्फुसातील हवा विभाजक पडद्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करते, व उचकी थांबण्यास मदत करते.श्वास राेखून धरणे व जीभ जाेरात पुढे ओढा, काेरडी भाकरी चावा व गिळा, लिंबाची साल कडू कार्ल्याच्या रसात बुडवून चाेखा, आल्याचा रस पाण्यात मिसळून घ्या.