ओशाे - गीता-दर्शन

26 Apr 2023 17:10:10
 
 
 
Osho
 
बाहेरची यात्रा करते.जननेंद्रियातून जास्तीत जास्त विद्युत बाहेर फेकली जाते आणि म्हणूनच आपण संभाेगानंतर इतके थकलेले, बैचेन अन उद्विग्न हाेऊन जाताे.कारण शरीराने बरीच विद्युत ऊर्जा बाहेर फेकून दिलेली असते.संभाेगानंतर आपला र्नतदाब खूपच वाढलेला असताे, हृदयाचे ठाेके जलद पडतात, वीर्यस्खलन हेच त्याचं कारण नाहीये. वीर्यस्खलनाबराेबरच जननेंद्रिय खूपच माेठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा शरीराच्या बाहेर फेकत राहतं. त्या विद्युत-ऊर्जेचेही कप्पे आहेत. म्हणून तर पद्मासन, सिद्धासन या ज्या बसण्याच्या शैली आहेत त्यामध्ये जननेंद्रियाला विद्युत पुरवठा करणाऱ्या बिंदूंना दाब मिळताे. अन् मग या बिंदूना दाबल्याने ताे पुरवठा बंद हाेताे.
 
दाेन्ही पाय शरीराबराेबर जुळून राहतात. आणि दाेन्ही पायातून जी ऊर्जा निघते ती शरीर परत परत आतच ठेवून घेतं.दाेन्ही हात जुळलेले असल्याने विद्युत त्यांचेतून बाहेर फेकली जात नाही. एका हातातून अशी ती यात्रा करते. सगळं शरीर अशा प्रकारे विद्युतवलयमय विद्युतचक्र झालेलं राहतं. महावीर या बुद्धांची प्रतिमा पाहिली तर पूर्ण शरीर विद्युतचक्र झालं आहे, हे लक्षात येईल. हे जे विद्युतचक्र निर्माण हाेतं ते आपली इंद्रिये आणि आपण यामध्ये एक संरक्षक म्हणून काम करतं. एक भिंत बनून जाते त्याची. इंद्रियं वेगळी राहतात, अन् आपण वेगळे पडता. लक्षात घ्या, या विद्युत ऊर्जेचा उगम आपल्या शरीराच्या आतच आहे. इंद्रिये तिचा फ्नत उपयाेग करीत असतात.
Powered By Sangraha 9.0