आयुर्वेदानुसार उसाचा रस बलदायक, रक्तवर्धक, वीर्यवर्धक, कफकारी, पित्तनाशक असताे. ताे मूत्रवर्धक आणि शीतलही असताे. सुश्रुतने लिहिले आहे, ऊस दातांनी चावून रस शाेषून घेतल्याने अधिक लाभ हाेतात.
ग्लासभर उसाचा रस घेतला असता उचकी बंद हाेते.
कावीळ झाली असता ऊस चावून खावा. ताे ही शक्यताे सकाळी. यासाठी सकाळची वेळ उत्तम.आठवडाभर जवाचे सत्त्व खाऊन वर ग्लासभर उसाचा रस घेतला असता कावीळ बरी हाेते.हलका ताप येत असेल, तर दिवसातून दाेन-तीन वेळा गलासभर उसाचा रस घेतल्याने बरे वाटते.
डांग्या खाेकला झाला असता, ग्लासभर उसाच्या रसात अर्धा कप मुळ्याचा रस घालून दिवसातून 2-3 वेळा नियमित घ्यावा. डांग्या खाेकला बरा हाेताे.
ज्यांना मुतखड्याचा (डीेंपश) त्रास आहे, त्यांनी ऊस चावून रस चाेखावा आणि ग्लासभर रस घ्यावा. काही दिवसामध्ये मुतखडा विरघळून बाहेर पडेल.
पित्ताच्या उलट्या हाेत असतील, तर ग्लासभर उसाच्या रसात दाेन चमचे मध घालून प्यावा.
ऊस बलवर्धक आहेच; पण भाेजन पचवून अजीर्ण दूर करताे. त्यामुळे ऊस/उसाचा रस नियमित घेतल्याने शरीर स्थूल हाेऊ लागले आहे.
भाेजनानंतर काही दिवस नियमितपणे ग्लासभर उसाचा रस घेतल्याने रक्त शुद्ध हाेऊन अनेक विकार बरे हाेतात.