राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू हाेणार : केसरकर

    20-Apr-2023
Total Views |
 
 
 
School
 
विदर्भातील शाळांना 30 जूनपासून प्रारंभ; शाळापूर्व तयारीसाठी मेळावा घेणारविद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू हाेण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियाेजन करता यावे, यासाठी यंदापासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जूनला सुरू हाेणारअसल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जूनला सुरू हाेतील, असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यंदाही मुलांच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिलपासून आणि दुसरा मेळावा जूनमध्ये घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबवला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाईल.
 
यंदापासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि साॅक्स शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नाेटस्) काढण्यासाठी आता एक पान काेरे ठेवले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी हाेईल, असा विश्वास केसरकर यांनी व्य्नत केला.येत्या वर्षापासून शाळांमध्ये ‘आजी आजाेबा दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अघाेषित व घाेषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघाेषित शाळांच्या नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 ट्नकेअनुदानासाठी पात्र घाेषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघाेस वाढ करण्यात आली असून, शिष्यवृत्तीच्या रकमेत माेठी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी हाेणार नाहीत हे खरे नसून, पालक- विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केल