करिअरमधील प्रगतीसाठी याेग्य दिशेने प्रयत्न करा

    15-Apr-2023
Total Views |
 
 


Career
 
आपल्या कामाचे काैशल्य आणि इतरांना मदत करण्याची तयारीसुद्धा महत्त्वाचीसंध्यानंद.काॅम उपजीविकेसाठी प्रत्येकाला काही ना काही राेजगार मिळवावा लागताे. काही जण नाेकरी करतात, तर काही व्यवसाय. आजकाल आपल्या छंदांमधूनसुद्धा कमाईचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. मार्ग काेणताही निवडलात, तरी त्यात प्रगती करणे, वरच्या पदावर जाणे अपेक्षित असते. तुम्ही नाेकरी करत असाल, तरीसुद्धा हे लागू हाेते.एखाद्या संस्था अथवा कंपनीत तुम्ही काम करत असाल, तर तेथील स्वत:च्या प्रगतीची जबाबदारी तुमची असते.‘आपली प्रगती आपल्याच हाती’ हे सूत्र कायम लक्षात ठेवा. एक चांगले करिअर करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात.
 
दर तीन वर्षांनी पदाेन्नतीचे एखाद्या कंपनीचे धाेरण असले, तरी करिअरचे याेग्य नियाेजन करणारे लाेक दीड वर्षात दाेन पदाेन्नतीसुद्धा मिळवू शकतात. मात्र, तुम्ही एकाच एका कामात गुंतून राहणेसुद्धा करिअरमधील प्रगतीला बाधक ठरते. नवीन ज्ञान आत्मसात करून नवीन करिअर सुरू करणारे लाेक तुम्हाला दिसतील. याेग्य वेळ निवडणे महत्त्वाचे असल्याचे यातून तुम्हाला कळेल.या अनुभवांतून गेलेली एक यशस्वी महिला काय म्हणते ते पाहा. ती म्हणते, की कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा प्राेसेस’द्वारे घेतला जाताे. पण, त्यातून पदाेन्नती मिळविणे किंवा प्रगती करणे हे माझे उद्दिष्ट नव्हते. माझे राेजचे काम आदर्श ठरावे एवढे चांगले करण्याचा निश्चय मी केला हाेता. माझ्या राेजच्या कामांवर मी पूर्ण लक्ष केंद्रित केले.साेबतच माझ्या सहकाऱ्यांबराेबरही साैहार्दाचे नाते निर्माण केले. माझ्या कामाच्या डेटाची सर्व माहिती मला हाेती.
 
आमच्या ग्राहकांच्या काय अपेक्षा आहेत, आमच्यापुढील आव्हाने काेणती हेही मला माहिती हाेते. उद्याेगक्षेत्रातील नव्या घडामाेडींची माहिती मी घेत हाेते आणि नवी परिभाषासुद्धा शिकत हाेते. माझ्या वरिष्ठांबराेबर बाेलताना मी ही भाषा वापरत हाेते. माझ्या कामाचा प्रगतीबराेबर संबंध असल्याचे मी कधी विसरले नाही. याचा परिणाम म्हणून मला लवकर पदाेन्नती मिळत गेली.
अपस्केलिंग’चा काळ : आपल्याला प्रगती करावयाची असेल, तर आपले ज्ञान आणि गुणवत्ता सतत वाढविणे (अपस्केलिंग) आवश्यक असते. जुन्यांबराेबरच नवीन काैशल्येसुद्धा त्यासाठी आत्मसात करावयास हवीत.
 
सध्याच्या तांत्रिक प्रगतीच्या काळात तुमचे ज्ञान अद्ययावत असणे आणि नवीन काैशल्ये आत्मसात असणे आवश्यक असते. ही महिला म्हणते, की स्वत:च्या प्रगतीसाठी तिने काही हजार रुपये खर्च करून नवीन काैशल्ये आत्मसात केली. तिने आव्हानात्मक प्राेजे्नट्सवर काम केले. ते हाती नव्हते, तेव्हा तिने स्वत:च काही प्राेजे्नट निवडले आणि अद्ययावत ज्ञानाच्या मदतीने ते यशस्वीसुद्धा केले. एकदा तुम्ही असा दृष्टिकाेन स्वीकारलात, तर तुमची प्रगती हाेण्यास वेळ लागत नाही आणि पाठाेपाठ पदाेन्नती मिळतेच, असे ही महिला सांगते. सध्याच्या काळात प्रत्येकाने अपस्केलिंगवर भर द्यावा, असा तिचा सल्ला आहे.गुणवत्ता आणि प्रगतीसाठी हे करून पाहा...
 
 आपल्या कामात पूर्ण पारंगत हाेणे आवश्यक असते.पाच वर्षांनंतर एखाद्या विशेष विभागाचा प्रमुख हाेण्याची तुमची इच्छा असेल, तर त्यासाठी काय करावे लागेल, काय शिकावे लागेल याचा विचार आताच करा. उदा.जाेरात पाऊस पडत असताना तुम्हाला एखाद्या मीटिंगला जाणे आवश्यक असल्याची कल्पना करा. या स्थितीत पावसाचे कारण देऊन मीटिंगला न जाण्याचा एक पर्याय तुमच्याकडे आहे आणि छत्री वापरून मीटिंगला जाणे हा दुसरा. आकाशात ढग दाटत असल्याचे दिसल्यावर लगेच छत्रीची व्यवस्था केलीत, तर तुम्हाला मीटिंगला जाण्यात अडचण येणार नाही. म्हणजेच, आपल्यासाठी काय महत्त्वाचे याचा निर्णय तुम्हालाच करावयाचा असताे.
 
 ‘परफाॅर्मन्स रिव्ह्यू’चा विचार करताना आपण सभाेवतालच्या स्थितीचा विचार करत नाही. आपल्या कामाच्या पद्धतीवरसुद्धा प्रगती अवलंबून असल्याचे लक्षात ठेवा. आपण फक्त आपल्या कामाचा विचार करून चालत नाही. तुम्ही इतरांना कशी आणि किती मदत करता यावरही ते ठरते.
 
 आपण काम करत असलेल्या जागेची पूर्ण माहिती तुम्हाला हवी. त्यातून संस्था किंवा कंपनीत तुमच्याबाबत विश्वास निर्माण हाेताे. नव्या घडामाेडींचे ज्ञान तुम्हाला असेल,तर कंपनी-संस्थेच्या भावी काळात तुम्हाला महत्त्वाचे स्थान मिळते.
 
 आपल्या डाेळ्यांपुढे उच्च उद्दिष्टे ठेवणे चांगले. उदा. काेणतीही चूक न करता गुणवत्तापूर्ण काम करणे, ई-मेलला उत्तर देण्यास विलंब न करणे, ठरलेल्या वेळात काम पूर्ण करणे आदी. यातून तुमच्याविषयी विश्वास निर्माण हाेताे.
 
 इमाेनेशल इंटेलिजन्स (इ्नयू) वाढवा. आपल्यातील ऊर्जा आपण कुतर्क, स्पर्धा, ईर्षा यांच्यासाठी वापरू शकताे किंवा आपल्यात बदल करण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठीसुद्धा. ती कशी वापरावी हे आपल्याच हाती असते. आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आपल्या कामाबाबत सहकाऱ्यांकडून कायम फिडबॅक घेतलात, तर फायदा हाेताे. भविष्यातील काैशल्ये आत्मसात करत राहा. त्यासाठी मार्गदर्शकांची मदत मिळवा. जेवढी नवीन तांत्रिक काैशल्ये शिकाल, तेवढी तुमची प्रगती हाेत जाईल.