उन्हाळ्यात वाळ्याचा वापर आवर्जून करा

06 Mar 2023 15:27:11
 
 

water 
वाळा हा अतिशय थंड गुणाचा आहे. पिवळा वाळा आणि काळा वाळा असे वाळ्याचे दाेन प्रकार आहेत. वाळा घातलेले पाणी पिण्याने शरीराला थंडावा तर मिळताेच, याशिवाय वाळ्याचे पडदे खिडक्या, दारे, गाड्या यांना लावल्याने उकाड्याची तीव्रता कमी हाेते.आराेग्यदायी वाळा अंगाची आग हाेणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयाेग हाेताे. लघवीला आग, जळजळ हाेणे, लघवीचे प्रमाण कमी हाेणे यावर वाळ्याचा उत्तम उपयाेग हाेताे. मुलांचा घाेळाणा ुटताे. यावर वाळ्यापासून तयार केलेले उशीरासव इतर औषधांबराेबर वापरतात. घामाेळ्या, अंगावर पित्त येणे, त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात.
 
खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयाेग करतात. भावनिक उद्रेक, जसकी तीव्र चिंता, भीती, बेभानावस्थेचा झटका, अस्वस्थता, हतबलपणा, नैराश्य अशा धाेकादायी मनाेवस्थांवरही वाळा अत्यंत प्रभावी आहे.साैंदर्यवर्धक वाळा त्वचाराेग, त्वचेची आग हाेणे, तारुण्यपीटिका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबराेबर वापर करतात.त्यामुळे त्वचा टवटवीत हाेते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. विशिष्ट प्रकारची सरबते, साबण, पावडर, सुगंधित द्रव्ये आणि विशेषत: अ‍ॅराेमा थेरेपीमधील तेलांमध्ये वाळ्याचा अर्क वापरला जाताे.
Powered By Sangraha 9.0