कन्या

    06-Mar-2023
Total Views |
 
 

pieces 
 
हा आठवडा तुमच्यासाठी सावधगिरी बाळगणारा असणार आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नकारात्मक विचार करणारी मंडळी आढळतील.त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा; अन्यथा तुमचे मनही त्याच प्रकारचे हाेईल. या आठवड्यात तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन सामान्य असणार आहे. भाग्यापेक्षा स्वत:च्या परिश्रमाच्या जाेरावर तुम्ही यश मिळवू शकता.आपण नाेकरीचे जीवन शानदार बनवू इच्छित असाल, तर सहकाऱ्यांसाेबत उत्तम संबंध राखा. व्यापाऱ्यांना चांगला फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कुटुंबाचा पूर्ण सहयाेग मिळेल.तुम्ही तुमच्या घरात एखादे धार्मिक अनुष्ठान करू शकता. घरातील वडीलधाऱ्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. सामाजिक जीवनातील तुमची व्यस्तता वाढू शकते.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आराेग्यासंबंधित आव्हानांचा सामना करावा लागू शकताे. आराेग्यावर तुमचा खर्चही वाढू शकताे.तुम्ही टायफाॅइड, डेंगू, चिकनगुनिया वा इतर प्रकारच्या तापाच्या तावडीत सापडू शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे.
 
 शुभदिनांक : 07, 09, 11
 
 शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्यावी.
 
 उपाय : गायीला ताजी भाजी खाऊ घालावी. श्रीगणेश चालिसा वाचावी.