सिंह

    06-Mar-2023
Total Views |
 
 

pieces 
हा आठवडा संसारी जीवन जगणाऱ्यांसाठी सुखद राहील. राजकीय क्षेत्रात कार्यरत लाेकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या आठवड्यात सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला फायदा मिळवण्याच्या अनेक संधी चालून येण्याची श्नयता आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरनुसार उत्तम परिणामांसाठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागू शकतात.
तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवर जास्त लक्ष द्यावे. यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात उत्तम संबंध निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारात फायदा हाेण्याची श्नयता आहे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सासुरवाडीकडून आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंबात सासू-सुनांत प्रेम वाढेल. मुलांच्या शिक्षणात एखादा अडथळा येत असेल, तर ताे दूर हाेईल. आर्थिक कारणांमुळे कुटुंबातील नात्यांत वाद हाेऊ शकतात. घरात पूजापाठाचा कार्यक्रम करू शकता.
 
 आराेग्य : हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमची एखाद्या प्रदीर्घ आजारातून मु्नती हाेऊ शकते; पण तुम्हाला तब्येतीच्या छाेट्या-माेठ्या कुरबुरी सतावू शकतात. तुम्हाला अंगदुखी आणि पाेटासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकताे. यासाठी तब्येतीकडे अधिक लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 07, 09, 10
 
 शुभरंग : केशरी, निळा, जांभळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात मनात नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका.
 
 उपाय : मुलांना गुळाचे पदार्थ खाण्यास द्या. ‘ॐ आंजनेयाय नम:’ मंत्राचा जप करा.