उन्हाळ्यात माठ, सुरई व इतर मातीच्या भांड्यांमध्ये थंड झालेले पाणी पिणे चांगले असते. या पाण्यात स्वच्छ धुतलेला वाळा घालून ठेवावा.त्यामुळे हे पाणी औषधी बनून त्यास सुगंधही येईल.पाणी पिताना यात चिमूटभर मीठ किंवा लिंबू पिळले तर उन्हाळ्यात घामामुळे बाहेर टाकल्या जाणाऱ्या शरीरातील मिठाची भरपाई हाेण्यास मदत हाेते. फ्रीजमधील थंड पाणी किंवा वरून र्बफ टाकून पाणी पिणे शक्यताे टाळावे.असे पाणी प्यायल्याने सर्दी, पडसे, घसा धरणे असा त्रास हाेताे.उन्हाळ्यातील गरम हवामानामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम हाेताे.उन्हाळ्यात आपल्याला ार तहान लागते. शिवाय, उन्हाळ्यात घामही ार येत असल्याने शरीरातील उपयुक्त क्षार व द्रवपदार्थ जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे अशक्तपणा वाटताे. त्यामुळे द्रवपदार्थांच्या सेवनावर भर हवा. उन्हाळ्यात दिवसभर थंड व द्रवपदार्थ घ्यायला हवेत.त्यामुळे शरीरातील उष्णता कमी हाेईल.शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातील. त्यामुळे इतर विकार टळून आराेग्य चांगले राहील