पालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून जलबचतीचा संदेश

    28-Mar-2023
Total Views |
 
 

School 
नवी मुंबई महापालिकेने 16 ते 22 मार्च या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जलजागृती सप्ताह आयाेजिण्यात आला हाेता. शहरात ठिकठिकाणी जलजागृतीसाठी हाेर्डिंग लावण्यात आली.तसेच, हस्तपत्रके वितरित करण्यात आली.शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीनवर जलबचतीचा संदेश प्रसारित करण्यात आला. यासाेबतच पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच कळावे यासाठी नवी मुंबई पालिकेच्या सर्व 79 शाळांत जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते.
 
पालिकेच्या 56 प्राथमिक व 23 माध्यमिक शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक हस्तफलक तयार करून त्यावर जलबचतीचे संदेश रेखाटले. काही शाळांत पाण्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा,रांगाेळी स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले हाेते. विद्यार्थ्यांवर जलबचतीचे संस्कार करण्यासाेबतच पालकसभा घेऊन पाणीचतीचा संदेश प्रसारित करण्यात आला.अनेक शाळांनी आपापल्या परिसरात जलजागृतीसाठी प्रभातफेऱ्या काढून पाणी वाचवा, जीवन वाचवा अशा प्रकारच्या घाेषणा देत पाण्याचे महत्त्व पटवून दिले.
 
काही शाळांत पाणी बचतीवर भाषणे, तर दाेन शाळांत कीर्तनेही सादर झाली.काही शाळांनी आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर, तसेच मुख्य चाैकांत जलजागृतीपर पथनाट्ये सादर केली. सर्व 79 शाळांतील वर्गावर्गामध्ये पाणीबचतीची सामूहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञेनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगत पाण्याचा अपव्यय टाळणे, पाणी बचतीविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई पालिका शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, तसेच 35 हजारांहून अधिक मुलांनी एकत्र येत जलबचतीचे महत्त्व अधाेरेखित केले.