यशासाठी प्रयत्न करा अन् जगण्याची मजाही लुटा

    27-Mar-2023
Total Views |
 

success 
 
संध्यानंद.काॅम मानवी आयुष्यात आदर्शांचे स्थान वेगळेच असते. आपण परिपूर्णतावादी (परफे्नशनिस्ट) असावे असे बहुतेकांना वाटते आणि त्यासाठी प्रयत्नही केले जातात. पण, आपण माणूस असल्याने शंभर टक्के तसे हाेऊ शकत नाही.प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही त्रुटी राहतेच.कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत हे बराेबर असले, तरी त्याला मर्यादा असतात हे विसरून चालणार नाही.परिपूर्ण असणे म्हणजेच जीवन नसते. मी चांगला पालक नाही, मी चांगला जाेडीदार नाही, मी पूर्णपणे निराेगी नाही, मी चांगला मित्र नाही आणि आर्थिक बाबींबाबत तर बाेलायलाच नकाे, असे विचार तुमच्या मनात येत असतील, तर जीवन निरुपयाेगी ठरते का? कारण, आदर्शांच्या निकषांवर एकही गाेष्ट बराेबर नाही. पण, वाईट वाटण्याचे कारण नाही. काेणतीही व्यक्ती शंभर टक्के परिपूर्ण कधी नसते.
 
स्वत:ला ‘परफे्नशनिस्ट’ म्हणून विचार करू नका. ते आपण आपल्याला मूर्खात काढण्यासारखे ठरते. एका मर्यादेपर्यंतच आदर्श हाेता येते.एखादी जादू हाेऊन आपण आपल्या क्षेत्रात वेळ नसला, तर घरी मुलांना साेबत घेऊन छानपैकी नाचता येऊ शकते. यात व्यायाम झाला आणि मुलेही खूश. अशा छाेट्या बाबी तुम्हाला एक चांगला माणूस बनवितात. शंभर टक्के परिपूर्ण हाेण्यापेक्षा चांगला माणूस हाेणे याेग्य.प्रयत्न असतील, तर यश न्नकी : तुम्ही आज दिवसभर काय केलेत? काय विशेष काम केलेत? आदर्श माता-पिता अथवा जाेडीदार हाेण्यासाठी तुम्ही काय केलेत? आपले आराेग्य, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय केलेत? असे अनेक प्रश्न असतात. ते साेडवायचे तर प्रयत्न करावे लागतील आणि आपले छाेटे प्रयत्न यशाकडे नेतात.