स्वतःविषयी बाेलताना काेणती काळजी घ्याल?

    27-Mar-2023
Total Views |
 
 

people 
 
या कामासाठी मी याेग्य नाही एखाद्या कामासाठी तुम्ही याेग्य आहात की नाही हे ठरवण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. अनेकदा तुमच्या क्षमतांची माहिती तुमच्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींना जास्त असते. त्यांचा तुमच्यावर विश्वास असताे म्हणून त्यांनी तुम्हाला विशिष्ट कामगिरीसाठी निवडलेले असते. अशावेळी मी या कामासाठी याेग्य नाही असे म्हणून तुम्ही त्यांच्या नियाेजनावर पाणी िफरवू नका.तुमच्यातील क्षमतांना पूर्ण न्याय देण्याची संधी म्हणून अशा निवडीकडे पाहा.कुणीही मला आधार देणार नाही आपल्यामध्ये कितीही त्रुटी असल्या तरी आपल्याला आधार देणाऱ्या व्यक्ती आपल्या अवतीभवती असतातच. त्यामुळे स्वतःची अन्य व्यक्तींशी तुलना करून अंदाज बांधू नका.
 
नव्या लाेकांना भेटत राहा. लाेकांशी बाेलत राहा.त्यातून तुम्हाला आणि तुमच्या काैशल्यांना संधी देणारी व्यक्ती तुम्हांला नक्की भेटेल.
मला जमेल असे वाटत नाही काहीही करण्याची क्षमता तुमच्यात आहे.त्यामुळे स्वतःच्या क्षमतेला कमी लेखू नका.नेहमी संधी मिळताच स्वतःला सिद्ध करण्याची तयारी ठेवा. त्यामुळे काेणतेही काम समाेर आल्यावर मला जमेल असे वाटत नाही, हे वाक्य कधीही उच्चारू नका. हे वाक्य कानावर पडताच त्यातून तुमचा आत्मविश्वास किती डळमळीत आहे याचा अंदाज समाेरच्या व्यक्तीला येताे. याउलट तुमच्या क्षमतेचा अंदाज असल्यानेच तुमची नव्या कामगिरीसाठी निवड केलेली असते.
 
ही कामगिरी पार पाडताना तुम्ही कुठेही कमी पडता आहात असा अंदाज जरी आला तरी तुमच्यावर कामगिरी साेपवणारे तुम्हांला आधार देण्यासाठी उभे असतात.ते फक्त तुम्हांला प्रत्यक्ष दिसत नाहीत किंवा तुम्हांला त्याची जाणीव नसते. कारण या काम गिरीत आपण एकटेच आहाेत या भावनेने तुम्ही काम स्वीकारलेले असते.माझी तयारी झालेला नाही कुठलीही कामगिरी पार पाडण्यासाठी कुणाचीच शंभर टक्के तयारी पूर्ण झालेली नसते. यशाचा मार्ग तुमच्या समाेर असल्याने कधीही स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ नका. तुम्ही माघार घेतलेली नसते ताेपर्यंत तुमची हार झालेली नसते. त्यामुळे मनात ध्येय ठेवून काम करत राहा.