सहा वृद्ध पेंग्विनचे माेतीबिंदू ऑपरेशन

    27-Mar-2023
Total Views |
 
 


penguin
 
सिंगापूरमधील ज्युराेंग बर्ड पार्कमध्ये प्रथमच सहा वृद्ध पेंग्विन पक्ष्यांच्या डाेळ्यांचे माेतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले आहे आणि हे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. ऑपरेशन करताना डाॅ्नटरांनी सर्व 6 वृद्ध पेंग्विनच्या डाेळ्यांत कस्टम मेड लेन्ससुद्धा बसविल्या.जनावरांचा इलाज करणाऱ्या मंडई वन्यजीव ग्रुपच्या व्हेटर्नरी डाॅ्नटरांनी सांगितले की, ऑपरेशननंतर सर्व 6 पेंग्विन पूर्वीप्रमाणेच सक्रिय आहेत.पेंग्विनची तपासणी करताना 20 वर्षे किंवा यापेक्षा जास्त वयाच्या तीन पेंग्विनमध्ये माेतीबिंदूची लक्षणे दिसून आली, तर 7 ते 13 वर्षांच्या तीन हम्बाेल्टस पेंग्विनला माेतीबिंदू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व पेंग्विनच्या माेतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले.माेतीबिंदू हा एका विशिष्ट वयानंतर हाेणारा नेत्रविकार आहे. हा विकार मनुष्य आणि पशु-पक्षी दाेघांनाही हाेताे.ऑपरेशन करताना राजा पेंग्विनच्या डाेळ्यात कस्टम मेड इंट्राे्नयुलर लेन्स बसविण्याची गरज भासली. त्यामुळे डाेळ्यात कृत्रिम लेन्स बसवावी लागते. व्हेटर्नरी डाॅ्नटर व नेत्रतज्ज्ञ डाॅ. ग्लेडिस ब्रु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले. या दरम्यान पेंग्विन पक्ष्यांना दूर ठेवावे लागले व त्यांच्या डाेळ्यात दाेन वेळा औषध टाकावे लागले.