आता घटस्फाेट घेण्याचाही व्हिडिओ

    27-Mar-2023
Total Views |
 
 


Video
पाश्चिमात्य देशांत आता प्री वेडिंग फाेटाेशूटप्रमाणेच डिव्हाेर्स फाेटाेग्राफीचे लाेण पसरू लागले आहे. घटस्फाेट घेऊन नवे आयुष्य सुरू केल्याची आठवण म्हणून डिव्हाेर्स फाेटाेग्राफी सुरू झाली आहे. पहिल्या विवाहाचे कडवट अनुभव विसरण्यासाठी सायकाेलाॅजिकली डिव्हाेर्स फाेटाेग्राफीचा सकारात्मक परिणाम हाेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.घटस्फाेटित व्य्नती विवाहाचे फाेटाे जाळून घटस्फाेटाचे फाेटाे जपून ठेवते.पाश्चिमात्य देशांत प्री वेडिंग फाेटाेशूट प्रमाणेच आता डिव्हाेर्स फाेटाेग्राफीही नवी इंडस्ट्री सुरू झाली आहे.
 
अमेरिकेतील मिशिगन शहरातील अ‍ॅलिसिआर्टाे नावाची वेडिंग फाेटाेग्राफर आता डिव्हाेर्स फाेटाेग्राफर बनली आहे. ती वर्षातून 50 वेडिंग इव्हेंटची फाेटाेग्राफी करीत हाेती. आता ती डिव्हाेर्स फाेटाेग्राफी करून प्रचंड कमाइकरीत आहे. समाजाची मानसिकता बदलत असल्याचे डिव्हाेर्स फाेटाेग्राफी हे उदाहरण आहे. या डिव्हाेर्स फाेटाेग्राफीचे ‘मूव्ह ऑन’ हॅपिली डिव्हाेर्स, सिंगल अगेन फायनली डिव्हाेर्स, असे प्रकार असून, दु:खद भूतकाळ विसरण्याचा डिव्हाेर्स फाेटाेग्राफी हा प्रयत्न आहे व या प्रकाराला आता भारतातही प्रतिसाद मिळू लागला आहे.