श्रीलंकेत राजा कश्यपाने खडकावर बांधला किल्ला आणि महाल

    27-Mar-2023
Total Views |
 
 
 
Sri lanka
 
श्रीलंकेतील दांबुला येथील सिगिरिया (सिंहगिरी) येथील ऐतिहासिक शैल दुर्गची (खडकावर बांधलेला) आहे. शेजारीच राजमहालाचे अवशेष दिसत आहेत. या किल्ल्याची उंची अंदाजे 590 फूट आहे. याच्या चारी बाजूला घनदाट झाडे आहेत व जलस्राेत आहेत. या परिसराला जगाचे 8 वे आश्चर्य जाहीर करण्यात आले आहे.राजा कश्यप यांनी इ.स. पूर्व 477-495 मध्ये दांबुला येथील शैल दुर्गला राजधानी बनविले हाेते. खडकांवर खांब गाडून हा किल्ला व महाल बांधण्यात आला हाेता. याचे प्रवेशद्वार सिंहाच्या विशाल जबड्यासारखे आहे.या किल्ल्याचे व महालाचे ऐतिहासिक व पुरातात्त्विक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी हजाराे संख्येने पर्यटक येत असतात.