स्मार्टफाेनच्या स्क्रीनवरील विविध आयकाॅन्सची माहिती असणे आवश्यक

    27-Mar-2023
Total Views |
 
 


Smartphone
 
आता घटस्फाेट घेण्याचाही व्हिडिओ खाेटे बाेलणे हा एक प्रकारचा आजारच आपले जीवन सुखकारक करण्यासाठी केली आहे त्यांची निर्मिती, विविध कामांसाठी असतात वेगवेगळी आयकाॅन्सस्मार्टफाेन ओपन केल्यावर समाेर दिसतात आयकाॅन्स. वेगवेगळे अर्थ सांगणारी, भिन्न कामांसाठी वापरली जाणारी. त्यांच्याशिवाय आपले काेणतेही काम हाेणार नाही एवढी ती महत्त्वाची असतात. एका आयकाॅनवर ्निलक केले, तर तुम्हाला हवे असलेले काम सुरू करता येते. तीन डाॅट्स, विमानाचे आयकाॅन, वर्तुळाकार बाण अशा विविध स्वरूपांत ही आयकाॅन्स असतात. तुमच्या टॅब्लेटच्या स्टेटस बारवरसुद्धा अशी आयकाॅन्स दिसतील. तुमचे जीवन सुखकर करणे हा त्यांच्या निर्मितीमागील हेतू असताे. पण, काहींना ही आयकाॅन्स गाेंधळात टाकणारीसुद्धा वाटतात. या आयकाॅन्सविषयी पाहा.
 
 फ्लाइट माेड : तुमचा स्मार्टफाेन, टॅब्लेट अथवा लॅपटाॅपवरील हे आयकाॅन फ्लाइट माेडसाठी असते. तुम्ही विमानाने प्रवास करत असताना ते वापरावयाचे असते. तुमचे नेटवर्क बंद करणे हे या आयकाॅनचे काम असते.
 
 नेटवर्क बार : हे चार बार तुमच्या डिव्हाइसला जीवन देतात. हा बार नसल्यावर काय हाेते हे तुम्ही पाहिले आहेत का? ते नसतात तेव्हा नेटवर्कमध्ये काही तरी समस्या येत असल्याचे दिसेल. तुम्ही आहात तेथे नेटवर्क आहे की नाही याची माहिती नेटवर्क बारमुळे मिळते. फाेनच्या सर्वांत डावीकडील काेपऱ्यात याचा आयकाॅन असताे. सध्याच्या काळात नेटवर्क सर्व्हिस आयकाॅनशेजारी दिसते.
 
 वायफाय : वायफायविना जीवनाची कल्पना तुम्हाला करता येईल का? जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढल्यापासून इंटरनेटविना जगण्याची कल्पनासुद्धा काेणी करू शकणार नाही. नेटवर्क बारशेजारी वायफाय आयकाॅन असते. तुमचा डिव्हाइस वायफायवर चालू असताे तेव्हा हे आयकाॅन दिसते. काही वेळा मात्र ते हिडन असते आणि सेटिंग्ज बदलून ते बदलता येते.
 
 माेबाइल डेटा 4जी : तुमचा फाेन वायफायवर चालू की फाेन नेटवर्कवर हे कसे ओळखाल? तुमचा फाेन इंटरनेटसाठी सेल्युलर नेटवर्क वापरताे तेव्हा त्याला माेबाइल डेटा म्हणतात.तुमचा डिव्हाइस सेल्युलर इंटरनेट वापरत असेल, तर त्यावर 4जी आयकाॅन झळकते.
 
 स्क्रीन राेटेट : तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर व्हिडिओ पाहत असताना किंवा गेम खेळत असताना स्क्रीन राेटेट ऑप्शन उपयाेगी पडताे. स्विपिंग डाउन किंवा अप करून तुम्हाला हे आयकाॅन पाहता येते.व्ह्यू माेड बदलण्यासाठी तुम्हाला हे आयकाॅन प्रेस करावे लागते.क्षितिजसमांतर दृश्यासाठी हे आयकाॅन चांगले.
 
ब्राइटनेस : तुम्ही बाहेर असताना फाेनवरील आयकाॅन्स पाहताना तुम्हाला अडचण येते का? तुमच्या फाेनचा ब्राइटनेस कमी झाल्यामुळे असे हाेते. सहसा ब्राइटनेस ऑटाे माेडवर असल्यामुळे फाेन प्रकाशानुसार अ‍ॅडजेस्ट हाेताे. ब्राइटनेस आयकाॅन सर्व फाेनमध्ये सारखेच असते.
 
ब्ल्यूटूथ : सध्याच्या स्मार्ट जीवनशैलीत ब्ल्यूटूथचा वापर अपरिहार्य आहे. अ‍ॅले्नसापासून गुगल हाेमपर्यंतची सर्व कामे यामुळे श्नय झाली आहेत. हे आयकाॅनही सर्व फाेनमध्ये सारखेच असते.याशिवाय फाेनवर आणखी अनेक आयकाॅन्स असतात. त्यांचे उपयाेग आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात स्मार्टफाेनविना चालणार नसल्यामुळे या आयकाॅन्सविषयी सर्व माहिती असणे आपल्यासाठी आवश्यक आहे.