‘दिलखुलास’मध्ये वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत

27 Mar 2023 14:57:16
 
 

Interviews 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व न्यूज ऑन एआयआर या माेबाइल अ‍ॅपवर साेमवारी (27 मार्च) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हाेईल. राज्यात ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. त्या अनुषंगानेच नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी काेणते नाविन्यपूर्ण लाेकाभिमुख उपक्रम व याेजना राबवण्यात येत आहेत, याबाबतची माहिती वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी विनाेद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 
Powered By Sangraha 9.0