मॅजेस्टिक आमदार निवासाचे हाेणार नूतनीकरण : मुख्यमंत्री

27 Mar 2023 14:54:35
 
 
 
 
CM
नवीन आराखड्यानुसार तळमजल्यावर भव्य प्रवेशद्वार; अठरा महिन्यांत काम हाेणार पूणदि मॅजेस्टिक या राज्य विधानमंडळ अतिथीगृहाच्या तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वास्तूच्या काेनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.यावेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विराेधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डाराजेंद्र भागवत आदींसह विधानमंडळ, तसेच बृहन्मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. या वास्तूचे अत्याधुनिकरण आणि सुशाेभीकरण येत्या 18 महिन्यांत पूर्ण करणार असल्याचअ‍ॅड. नार्वेकर यांनी सांगितले.
 
फाेर्टमधील दि मॅजेस्टिक वास्तू ग्रेड 2 ए हेरिटेज इमारत असून, ती वास्तव्यास धाेकादायक झाली आहे.तिचे संवर्धन करणे आवश्क असल्यानउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे.हे नूतनीकरण करताना या हेरिटेज वास्तूला काेणताही धक्का लावण्यात येणार नाही.या इमारतीच्या नवीन आराखड्यानुसार तळमजल्यावर भव्य प्रवेशद्वार आणि स्वागत कक्ष, जेवण, काॅफी शाॅप त्याचबराेबर मल्टी क्युझिन रेस्टाॅरंट असेल.पहिल्या मजल्यावर दिव्यांग अतिथींसाठी युनिव्हर्सल सूट आणि जागतिक दर्जाच्या साेयीसुविधांनीयुक्त 72 डिलक्स आणि सुपर डिलक्स अतिथी खाेल्या आणि सूट प्रस्तावित आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यालये प्रस्तावित आहेत, तर चाैथ्या मजल्यावर प्रेसिडेंशियल सूट प्रस्तावित आहे.
Powered By Sangraha 9.0