तेरा भूखंडांच्या विक्रीतून सिडकाेला 719 काेटी

    27-Mar-2023
Total Views |
 
 

CIDCO 
 
सडकाेच्या 52 वर्षांच्या इतिहासात भूखंडांना विक्रमी दर प्राप्त झाल्याच्या घटनेला चार महिन्यांचा कालावधी लाेटत नाही ताेच, नुकत्याच सिडकाेच्या भूखंड विक्री याेजनेत आतापर्यंतचा सर्वाधिक सहा लाख 72 हजार 651 रुपये प्रतिचाैरस मीटर विक्रमी दर सिडकाेला प्राप्त झाला आहे. या भूखंड विक्री याेजनेद्वारे 13 भूखंडांची विक्री करून सिडकाेच्या तिजाेरीत 719 काेटी 25 लाख रुपयांचे उत्पन्न जमा हाेणार आहे.या भूखंड विक्री याेजनेत नेरुळ सेक्टर-4 येथील ज्या भूखंड क्रमांक-23ला सहा लाख 72 हजार 651 रुपये प्रतिचाैरस मीटर विक्रमी दर प्राप्त झाला आहे, ताे भूखंड गेली कित्येक वर्षे नवी मुंबईतील एका राजकीय पदाधिकाऱ्याने हडप करण्याचा प्रयत्न चालवला हाेता.
 
काही महिन्यांपूर्वी हा भूखंड सिडकाेने ताब्यात घेऊन त्याची निविदेद्वारे विक्री केली.जवळपास अडीच हजार चाैरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडाच्या विक्रीतून सिडकाेला 165 काेटी 42 लाख रुपये प्राप्त हाेणार आहेत. या भूखंडाला ऍरामस हेवन एलएलपी या कंपनीने सर्वाधिक बाेली लावली आहे. यापूर्वी सानपाडा सेक्टर-20 येथील भूखंडाला पाच लाख 54 हजार रुपये ही सर्वाधिक बाेली सिडकाेला मिळाली हाेती.अशाच प्रकारे नेरुळ सेक्टर-19 ए मधील भूखंड क्र. 55, 56 व 60 या तीन भूखंडांवरही भूमाफिया व राजकीय पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण केले हाेते. मात्र, सिडकाेचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजय मुखर्जी यांनी काेणत्याही दबावाला न जुमानता नेरुळमधील चारही अतिक्रमित भूखंड ताब्यात घेऊन त्यांची निविदेद्वारे विक्री केली. अतिक्रमित चारही भूखंड विक्रीपाेटी सिडकाेला 358 काेटी रुपये मिळणार आहेत.
 
नवी मुंबईतीलभूखंडांचे दर गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडत आहेत. गत सहा महिन्यांपासून सिडकाेच्या ऐराेली, घणसाेली, वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघरमधील काही माेक्याच्या भूखंडांना जास्त रकमेची बाेली प्राप्त झाली हाेती.या भूखंड विक्री याेजनेत दाेन भूखंड काेपरखैरणे, एक भूखंड घणसाेली व उर्वरित 10 भूखंड नेरुळ नाेड्समधील आहेत. काेपरखैरणेतील एका भूखंडाला चार लाख पाच हजार रुपये, तर दुसऱ्या भूखंडाला तीन लाख 15 हजार रुपये प्रतिचाैरस मीटर दर प्राप्त झाला आहे.घणसाेलीतील भूखंडाला एक लाख 56 हजारांचा दर प्राप्त झाला आहे. तसेच, नेरुळ येथील उर्वरित नऊ भूखंडांना दाेन लाखांपासून तीन लाख 35 हजार रुपयांपर्यंतचा दर प्राप्त झाला आहे.नवी मुंबई शहराची उभारणी करताना सिडकाेने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा व रेल्वे-विमानतळ- मेट्राेसारख्या दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे नागरिक आकर्षित हाेत आहेत. त्यामुळेच सिडकाे भूखंडांचेही माेल वाढत आहे, असे डाॅ. मुखर्जी यांनी सांगितल